‘एक आई म्हणून विनंती करतेय…’; राज कुंद्रा प्रकरणी शिल्पा शेट्टीनं मांडली भूमिका

शिल्पा शेट्टीने पोस्ट शेअर करत केली विनंती, शिल्पा शेट्टीची पोस्ट चर्चेत…

shilpa shetty, shilpa shetty post,
शिल्पा शेट्टीची पोस्ट चर्चेत…

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि बिझनेसमॅन राज कुंद्राला पॉर्नोग्राफीच्या आरोपांखाली १९ जुलैला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली. त्यानंतर शिल्पा शेट्टीसंदर्भात देखील बऱ्याच चर्चा झाल्या. शिल्पाला या सगळ्या विषयी माहित होते अशा चर्चा सुरु झाल्या होत्या. त्यानंतर शिल्पाने काही मीडिया ग्रुप्सवर खोट्या बातम्या पसरवल्याचा आरोप केला. दरम्यान, आता तिने एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करत तिने या सगळ्यांचा तिच्या आयुष्यावर काय परिणाम होत आहे ते सांगितले असून कोणतीही खोटी बातमी छापू नका असे सांगितले आहे.

शिल्पाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. ‘गेले काही दिवस आमच्यासाठी आव्हानात्मत होते. अनेक अफवा आणि आरोप केले जात आहेत. माध्यमांनी आणि काही लोकांनी माझ्याविषयी अनेक अनावश्यक गोष्टी सांगितल्या आहेत. माझ्या कुटुंबाला ट्रोल करण्यात आले, प्रश्न विचारले गेले. मी कोणतीही गोष्ट अजून बोलले नाही आणि या प्रकरणात मी हे करणं टाळत राहणार आहे कारण हे सगळं न्यायालयीन आहे, म्हणून माझं नाव घेऊन कोणतीही चुकीची विधान पसरवू नका,’ असे शिल्पा म्हणाली आहे.

आणखी वाचा : ‘राज कुंद्रा मला किस करत म्हणाला, माझे शिल्पासोबतचे संबंध ठीक नाहीत आणि…’, शर्लिन चोप्राचा धक्कादायक दावा

पुढे शिल्पा म्हणाली, ‘एक कलाकार म्हणून, कधीही कोणत्या गोष्टीची तक्रार करू नका, कधीही कोणाला समजावून सांगू नका या तत्त्वाचं मी पालन करते. या सगळ्या प्रकरणात माझा मुंबई पोलिस आणि भारतीय न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. एक कुटुंब म्हणून, मी तुम्हाला नम्रपणे विनंती करते, विशेषत: एक आई म्हणून माझ्या मुलांच्या भविष्यासाठी आमच्या प्रायव्हसीचा आदर करा. सत्य जाणून घेतल्याशिवाय अर्धवट माहितीच्या आधारे टिप्पणी करू नका. कायद्याचे पालन करणारी मी एक भारतीय नागरीक असून गेल्या २९ वर्षांपासून मेहनत करत आहे. लोकांनी आज पर्यंत माझ्यावर विश्वास ठेवला असून मी कोणालाही निराश केले नाही.’

आणखी वाचा : ..म्हणून शिल्पाने विकला बुर्ज खलिफामधील ५० कोटी रुपयांचा फ्लॅट

पुढे शिल्पा सगळ्यांना विनंती करत म्हणाली, ‘सगळ्यात महत्वाचं, मी सगळ्यांना विनंती करते की माझ्या कुटुंबाचा आणि माझ्या प्रायव्हसीच्या अधिकारांचा या वेळी आदर करा. आम्ही मीडिया ट्रायचे पात्र नाही. सत्यमेव जयते!’

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Shilpa shetty shares her statement on social media says respect our privacy dcp

Next Story
गॉसिप
ताज्या बातम्या