बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आज परेश रावल यांचा वाढदिवस साजरा करतेय. होय, बॉलिवूडमधले ज्येष्ठ अभिनेते परेश रावल यांचा आज वाढदिवस आहे. एकीकडे बॉलिवूडमधील अनेक कलाकार ज्येष्ठ अभिनेते परेश रावल यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. तर दुसरीकडे अभिनेत्री शिल्पा शेट्टीने आपल्या अनोख्या अंदाजात परेश रावल यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. थोड्या वेळापूर्वीच शिल्पा शेट्टीने परेश रावल यांचा एक जुना व्हिडीओ शेअर केलाय. हा व्हिडीओ शेअर केल्यानंतर अवघ्या काही तासांतच हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.

शिल्पा शेट्टीने शेअर केलेला हा व्हिडीओ परेश रावल यांच्या ‘हंगामा २’ चित्रपटाच्या शूटिंग दरम्यानचा आहे. या व्हिडीओमध्ये शिल्पा शेट्टी ही परेश रावल यांच्यासोबत स्कूटीवर बसलेली दिसून येत आहे. परेश रावल हे स्कूटी चालवणार असल्याचं या व्हिडीओत दिसून येत आहेत. इतक्यात शिल्पा शेट्टीच्या टीममधून एक मुलगी येते आणि शिल्पा शेट्टीला म्हणते, “ऑल द बेस्ट”. यावर शिल्पा शेट्टी परेश रावल यांना चिडवण्यासाठी म्हणते, “होय, आता मला ऑल द बेस्टची गरज आहे, कारण स्कूटी परेशजी चालवणार आहेत.” हे ऐकून यावर परेश रावल त्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव आणतात. सोशल मीडियावर हा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. हा व्हिडीओ शेअर करताना शिल्पा शेट्टीने लिहिलं, “हॅप्पी बर्थडे परेश रावल जी, तुमच्यासोबत असताना एकही क्षण हसल्याशिवाय जात नाही, हे मला खूप आवडतं…प्रत्येक वर्ष हे असंच जाऊ देत… ”

ज्येष्ठ अभिनेते परेश रावल आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टी लवकरच ‘हंगामा २’ मधून एकत्र झळकणार आहेत. त्यामूळेच गेल्या काही दिवसांपासून दोघांच्या ट्यूनिंगवरून ते चर्चेत आले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ज्येष्ठ अभिनेते परेश रावल यांना त्यांचा प्रत्येक वर्षीचा वाढदिवस काम करताना घालवायचा आहे. परंतू यंदाच्या वर्षी ते घरीच अडकले आहेत. परेश रावल यांचा वाढदिवस ३० मे १९५५ रोजी मुंबईतल्या एका सामान्य कुटूंबात झाला. त्यांनी त्यांचं शिक्षण मुंबईतलं प्रसिद्ध कॉलेज नर्सी मूंजी कॉलेज ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इकनॉमिक्‍समधून पूर्ण केलं. त्यांनी आतापर्यंत जवळपास २०० पेक्षा जास्त चित्रपटात दमदार अभिनय दिला आहे.