scorecardresearch

‘सरसेनापती हंबीरराव’चं तिकीट दाखवा अन् अर्धा डझन आंबे मोफत मिळवा, वाचा कुठे, कधी आणि केव्हा?

दिग्दर्शक-अभिनेते प्रवीण तरडे यांचा सरसेनापती हंबीरराव’ चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक चित्रपटगृहांमध्ये गर्दी करत आहे. आता हा चित्रपट पाहणाऱ्यांसाठी एक हटके ऑफर ठेवण्यात आली आहे.

Sarsenapati Hambirrao, entertainment,
दिग्दर्शक-अभिनेते प्रवीण तरडे यांचा सरसेनापती हंबीरराव’ चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक चित्रपटगृहांमध्ये गर्दी करत आहे. आता हा चित्रपट पाहणाऱ्यांसाठी एक हटके ऑफर ठेवण्यात आली आहे.

दिग्दर्शक-अभिनेते प्रवीण तरडे (Pravin tarde) यांनी मराठी चित्रपटसृष्टीची मान आणखी उंचावली आहे असं म्हणायला हरकत नाही. काही दिवसांपूर्वीच त्यांचा ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ चित्रपट प्रदर्शित झाला आणि त्याने बॉक्सऑफिसर अक्षरशः धुमाकूळ घातला. आता त्यांचा स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव यांच्या शौर्याला सलाम करणारा ‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपट प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी सध्या चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षक गर्दी करत आहेत.

आता एका इतिहास वेड्या प्रेक्षकाने ‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपट पाहणाऱ्या प्रेक्षकांसाठी ऑफर ठेवली आहे. ‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपट पाहून झाल्यावर या चित्रपटाचं तिकीट दाखवा आणि अर्धा डझन आंबे मोफत मिळवा अशी ही ऑफर आहे. आपला इतिहास प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचला पाहिजे यासाठी ही नवी कल्पना गीतांजली सोनसुरकर, तुषार सोनसुरकर यांना सुचली आणि त्यांनी हा उपक्रम सुरु केला.

आणखी वाचा – VIDEO : मध्यरात्री भररस्त्यातच उभं राहून जेवत होता कार्तिक आर्यन, व्हिडीओ पाहून लोक म्हणाले…

विशेष म्हणजे ही अनोखी कल्पना प्रेक्षकांच्या पसंतीस देखील पडत आहे. २७मे पासूनच त्यांनी ही ऑफर सुरु केली असून येत्या ३० मेपर्यंत तुम्ही या चित्रपटाच्या तिकीटावर अर्धा डझन आंबे मिळवू शकता. पण चित्रपट पाहून झाल्यानंतरच ही तिकीट तुम्ही या ऑफरसाठी दाखवू शकता. 10/1 मॉर्डन इमारत, जेबी रोड, कॉटन ग्रीन, मुंबई येथे तुम्ही संध्याकाळी ५ ते रात्री ९ यावेळेत तिकीट दाखवून अर्धा डझन आंबे घरी घेऊन येऊ शकता. तसेच इन्स्टाग्रामवर देखील त्यांचं fresh__greeny नावाचं अधिकृत अकाऊंट आहे.

आणखी वाचा – VIDEO : …अन् पार्टीमध्ये बेधूंद होऊन नाचत राहिला शाहरुख खान, अभिनेत्याचा ‘तो’ व्हायरल व्हिडीओ चर्चेत

रत्नागिरी येथील सोनसुरकर यांच्या बागेतील हे फ्रेश आंबे आहेत. आपला इतिहास प्रत्येक प्रेक्षकापर्यंत पोहोचला पाहिजे तसेच आपल्या स्वराज्यातील प्रत्येक सरसेनापतीचं कतृत्व प्रत्येक वयोगटातील व्यक्तीला कळलं पाहिजे यासाठी सोनसुरकर यांनी हा सगळा खटाटोप केला आहे. आतापर्यंत जवळपास ५० ते ६० लोकांनी या ऑफरचा लाभ घेतला आहे. सोनसुरकर यांचा हा निर्णय आणि ऑफर खरंच कौतुकास्पद आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Show the ticket of sarsenapati hambirrao marathi movie and get half dozen mangoes for free kmd