Shraddha Kapoor Confirms Relationship with Boyfriend Rahul Mody : श्रद्धा कपूर गेल्या काही काळापासून बॉयफ्रेंड राहुल मोदीबरोबरच्या नात्यामुळे चर्चेत आहे. अभिनेत्रीने राहुलबरोबर तिचा वाढदिवस साजरा केला. गुरुवारी, (१८ सप्टेंबर) अभिनेत्रीने एक मजेदार व्हिडीओ शेअर केला, ज्यामध्ये ती तिच्या बॉयफ्रेंडबरोबरचा एक मजेदार क्षण शेअर करताना दिसत आहे.
श्रद्धा कपूरने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये श्रद्धा बसलेली दिसत आहे. व्हिडीओ झूम इन-आउट करत आहे. ती प्रथम हसते, नंतर टक लावून पाहते. नंतर रागाने काहीतरी बडबडत ती ग्लास उचलते. हा व्हिडीओ शेअर करताना श्रद्धा कपूरने लिहिले, “असे नखरे सहन करू शकेल अशा व्यक्तीला शोधा.” श्रद्धा कपूरने पोस्टमध्ये राहुल मोदीला टॅग केले आणि कॅप्शनमध्ये लिहिले, “कोणाकडे असा ‘हट’ ऐकणारा आहे?” हा व्हिडीओ तिचा बॉयफ्रेंड राहुल मोदीनेच शूट केला आहे. पोस्ट लगेच व्हायरल झाली आणि चाहत्यांनी त्यावर कमेंट्सचा वर्षाव केला. एका चाहत्याने लिहिले, “नखरे नाहीतर क्यूटनेस बोलतात याला.” दुसऱ्याने म्हटले, “खूपच छान व्हिडीओ, खूप मजेदार.” दुसऱ्याने कमेंटमध्ये म्हटले आहे, “क्यूट दिसत आहेस.”
श्रद्धा आणि राहुलच्या प्रेमाबद्दलची चर्चा २०२४ च्या सुरुवातीला सुरू झाली, जेव्हा दोघेही मुंबईत डिनर डेटनंतर एकत्र दिसले. ते अनेक वेळा एकत्र दिसले आहेत. एका एअर होस्टेसने एकदा श्रद्धा आणि राहुल मोदीला फ्लाइटमध्ये एकत्र पाहिले आणि गुप्तपणे त्यांचा व्हिडीओ रेकॉर्ड केला. श्रद्धा कपूर आणि राहुल मोदी अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या प्री-वेडिंग पार्टीत आणि चित्रपटाच्या स्क्रीनिंगमध्येदेखील दिसले.
श्रद्धाने कायमच तिचं लव्हलाईफ प्रायव्हेट ठेवलं आहे. पण, आता ती मोकळेपणाने राहुलवरचं प्रेम व्यक्त करत असून त्याच्याबरोबर फिरतानाही दिसत आहे. राहुलला पाहून अनेकांनी श्रद्धाची खिल्लीही उडवली. याच्यापेक्षा चांगला मिळाला असता असं म्हणत अनेकांनी तिला ट्रोल केलं.
कामाच्या बाबतीत बोलायचं झालं तर श्रद्धा कपूर शेवटची ‘स्त्री २’ मध्ये दिसली होती, जी बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर होती. तिचा मागील चित्रपट, रणबीर कपूर अभिनीत ‘तू झुठी मैं मक्कार’देखील बॉक्स ऑफिसवर हिट झाला होता. चाहते श्रद्धाच्या आगामी प्रोजेक्ट्सची आतुरतेने वाट पाहत आहेत.