दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनची मुख्य भूमिका असलेल्या ‘पुष्पा’ चित्रपटानं सर्वांनाच वेड लावलं आहे. १७ डिसेंबरला हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचं हिंदी व्हर्जन नुकतंच ओटीटीवर प्रदर्शित झालं. चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनसाठी अभिनेता श्रेयस तळपदेनं आवाज दिला आहे. श्रेयस सध्या ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेत यशवर्धन चौधरी ही भूमिका साकारत आहे आणि या मालिकेत परीची भूमिका साकारणाऱ्या मायराचा एक व्हिडीओ त्यानं इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये लहानगी मायरा, पुष्पा अर्थात अल्लू अर्जुनची नक्कल करताना दिसत आहे.

‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेतील परीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहे. ‘पुष्पा’ चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये एवढी क्रेझ आहे की, चित्रपटातील संवाद तर अनेक प्रेक्षकांच्या अक्षरशः तोंडपाठ झाले आहेत. अनेकांनी यावर व्हिडीओ आणि रिल्स तयार केले आहेत. मग यात परी कशी मागे राहिल? तिनंही श्रेयस तळपदेसोबत ‘पुष्पा नाम सुनकर फ्लॉवर समझें क्या…’ या लोकप्रिय डायलॉगवर व्हिडीओ शूट केला आहे.

परीचा हा व्हिडीओ स्वतः श्रेयस तळपदेनं त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्याची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. परी आणि श्रेयश यांची ही धम्माल जोडी सध्या या व्हिडीओच्या माध्यमातून सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत. हा व्हिडीओ शेअर करताना श्रेयसनं लिहिलं, ‘जेव्हा ही गोंडस मुलगी ऑर्डर देते तेव्हा तुम्हाला हार मानावीच लागते.’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा’ चित्रपट आंध्र प्रदेशमधल्या डोंगराळ भागात सुरू असलेल्या लाल चंदनच्या तस्करीवर आधारित आहे. याच्या हिंदी व्हर्जनसाठी श्रेयस तळपदेनं आवाज दिला. याची पोस्ट त्यानं सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर त्याचं बरंच कौतुकही झालं. ‘भारतातील अतिशय लोकप्रिय आणि स्टायलिश अभिनेत्याला आवाज देताना मला प्रचंड आनंद झाला आहे. अल्लू अर्जुनचा पुष्पा आता हिंदीमध्ये’ या आशयाची पोस्ट श्रेयसने केली होती.