करोनाच्या दुसऱ्या लाटेचा परिणाम सध्या प्रत्येकाच्याच जीवनावर होताना दिसून येतोय. मग यात अगदी सामान्य नागरिकांपासून ते बॉलिवूडमधल्या कलाकारांपर्यंत सगळेच जण करोनाच्या विळख्यात सापडत आहेत. बॉलिवूडचा ‘गल्ली बॉय’ अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी याला देखील काही दिवसांपूर्वी करोना झाला होता. आता त्याच्या प्रकृतीत सुधार झाल्यानंतर सध्या तो होम क्वारंटाइन आहे. होम क्वारंटाइनमध्ये असताना मोकळ्या वेळात तो नेहमीच सकारात्मक पोस्ट शेअर करीत असतो. आज त्याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून गाणं गात असल्याचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. विशेष म्हणजे ते गाणं त्याने स्वत: लिहीलं आहे.

त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये तो एक गाणं गाताना दिसतोय. हे गाणं त्याने त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलं आहे. हे गाणं शेअर करताच त्याच्या चाहत्यांनी व्हिडीओवर कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पाडला आहे. एका चाहत्याने तर ‘ही व्यक्ती कोणती गोष्ट करू शकत नाही असं होणारच नाही’, अशी कमेंट केली आहे. ” कोई बात नहीं मेरे यार…कोई बिस्तरपे अकेला है…तो कोई बिस्तर के लिए झेला है…कोई आखिरी सिगरेट बचा रहा है…तो कोई किसी की आखिरी सॅांस.. मुश्किल घडी है…पर हम सब साथ है..है ना ? कोई नहीं..कोई बात नहीं मेरे यार ! सब ठीक हो जाएगा “असे कॅप्शन त्याने या व्हिडीओला दिले आहे.

काही दिवसांपूर्वी तर अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी याने सध्याच्या करोना परिस्थीतीवर एक कविता देखील केली होती. अनेक सेलिब्रिटींनी त्यावर कमेंट करत लवकर बरा हो असं देखील म्हटलं होतं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्याच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, ‘फोन भूत’ या त्याच्या आगामी चित्रपटात तो अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता इशान खट्टर सोबत दिसणार आहे. तसंच शकुन बत्रा यांच्या आगामी चित्रपटामध्ये अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अनन्या पांडे यांच्यासोबत झळकणार आहे.