scorecardresearch

Premium

आमिर, अक्षयनंतर अजय देवगणला बॉयकॉट करण्याची होतेय मागणी, जाणून घ्या कारण

सोशल मीडियावर अजय देवगणला बॉयकॉट करण्याची मागणी नेटकरी करत आहेत.

ajay devgan

गेले काही दिवस संपूर्ण बॉलिवूडमध्ये बॉयकॉट ट्रेंड करत आहे. प्रेक्षक बॉलीवूड कलाकारांना विरोध करत त्यांच्या चित्रपटांवर बहिष्कार घालत आहेत. ‘लाल सिंग चड्ढा’मुळे आमिर खान, ‘रक्षा बंधन’मुळे अक्षय कुमार याचे परिणाम भोगावे लागले. तर त्यापाठोपाठ आता अभिनेता अजय देवगण यालाही बॉयकॉटचा फटका बसणार असल्याचे दिसते. सोशल मीडियावर अजय देवगणला बॉयकॉट करण्याची मागणी नेटकरी करत आहेत.

आणखी वाचा : “अयान मुखर्जीला हुशार म्हणणाऱ्यांना तुरुंगात पाठवले पाहिजे…” ‘ब्रम्हास्त्र’वर कंगनाची आगपाखड

politics shinde thackeray group nashik municipal corporation strike demands
नाशिक मनपा कर्मचारी चौदा दिवसानंतर संपावर; सत्ताधाऱ्यांसह शिंदे गटाची कोंडी करण्यासाठी ठाकरे गटाची चाल
Rutuja home
“घर घेतल्यावर आता त्याचा EMI…,” ऋतुजा बागवेचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली…
Parineeti Chopra Raghav Chadha Wedding Update
राघव चड्ढांनी एन्जॉय केला मोजड्या लपवण्याचा खेळ; मेव्हणींना दिली ‘ही’ महागडी भेटवस्तू
vivek-agnihotri-nanapatekar
“माझ्या चार थोबाडीत मारा पण…” नाना पाटेकरांसह काम करण्याच्या अनुभवाबद्दल विवेक अग्निहोत्रींची प्रतिक्रिया

अजय देवगणचा ‘थॅंक गॉड’ हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. या ट्रेलरच्या माध्यमातून चित्रपटातील अजय देवगणचा लूकही समोर आला आहे. या दिवाळीत म्हणजे २५ ऑक्टोबर २०२२ रोजी प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन इंद्र कुमार यांनी केले असून हा एक विनोदी चित्रपट आहे.

या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये असे दाखवण्यात आले आहे की, सिद्धार्थ मल्होत्राचा अपघात होतो, त्यानंतर त्याच्या कर्मांचा हिशोब त्याला थेट चित्रगुप्ताच्या दरबारात द्यावा लागतो. अजय देवगण या चित्रपटात चित्रगुप्ताच्या भूमिकेत दिसत आहे. पण या ट्रेलरमध्ये दाखवलेल्या काही दृश्यांमुळे सोशल मीडियावर या चित्रपटाला आणि अजय देवगणलाही बॉयकॉट करण्याची मागणी केली जातेय. चित्रगुप्त आणि हिंदू देव-देवतांची ज्यापद्धतीने या चित्रपटात खिल्ली उडवली गेली आहे त्याचा सोशल मीडियावर सर्वत्र विरोध केला जात आहे. तर संपूर्ण बॉलीवूडला आता बॉयकॉट करण्याची वेळ आली आहे, असे काही नेटकऱ्यांनी म्हटलं आहे.

एका नेटकऱ्याने लिहिले आहे की, “हिंदूंच्या नावावर आणि हिंदू देवांच्या नावावर अश्लीलता दाखवणं सुरू आहे ते बंद करा.” दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिले आहे की,”बॉलीवूडला विनोद करायचे असतील तेव्हा फक्त हिंदू देवच दिसतात का?” थॅंक गॉड मध्ये अजय देवगणनं चित्रगुप्तांची भूमिका केली आहे. आणखी एकाने लिहिले आहे, “कधीपर्यंत आम्ही अशा घाणेरड्या मनोरंजनाला आणि अभिनयाला सहन करायचं?”

हेही वाचा : तब्बूने अजय देवगणसाठी केलेल्या खास पोस्टने वेधले नेटकऱ्यांचे लक्ष, म्हणाली….

दरम्यान, काही दिवसांपासून अजय आणि तब्बू त्यांच्या आगामी ‘भोला’ या चित्रपटामुळे चर्चेचा केंद्रबिंदू आहेत. या चित्रपटाच्या घोषणेपासून याची प्रेक्षकवर्गात उत्सुकता होती. गेले अनेक दिवस या चित्रपटाचे शूटिंग सुरु होते. अखेर नुकतेच अजय आणि तब्बूने ‘भोला’ चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Social media users stand against ajay devgan demanding to boycott him rnv

First published on: 11-09-2022 at 10:48 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×