Sharmila Tagore’s marriage mantra : शर्मिला टागोर त्यांच्या काळातील सर्वोत्तम अभिनेत्रींपैकी एक होत्या, त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले आणि त्यांच्या कारकिर्दीच्या मध्यभागी क्रिकेटपटू मन्सूर अली खान पतौडी यांच्याशी लग्न केले.

लग्नानंतरही त्यांनी काम सुरू ठेवले आणि त्यांच्या वैयक्तिक-व्यावसायिक जीवनात संतुलन राखले. शर्मिला टागोर यांना माहित होते की, त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात आणि घरात शांतता राखण्यासाठी त्यांना काय करावे लागेल आणि मग जेव्हा वेळ आली तेव्हा त्यांनी त्यांची मुलगी सोहा अली खानलाही हाच सल्ला दिला.

शर्मिला यांनी सोहाला दिला ‘हा’ सल्ला

हॉलीवूड रिपोर्टर इंडियाशी बोलताना सोहा अली खानने खुलासा केला की, तिच्या आईचा असा विश्वास होता की, निरोगी वैवाहिक जीवनासाठी स्त्रीने नेहमीच पुरुषाच्या अहंकाराची काळजी घेतली पाहिजे. जेव्हा सोहाने अभिनेता कुणाल खेमूशी लग्न केले तेव्हा त्यांनी तिलाही हाच सल्ला दिला. सोहा म्हणाली, “माझ्या आईने मला सांगितले होते की, महिलांनी पुरुषाच्या अहंकाराची काळजी घेतली पाहिजे आणि पुरुषाने स्त्रीच्या भावनांची काळजी घेतली पाहिजे. जर तुम्ही हे करू शकलात, तर तुमचे नाते दीर्घ आणि यशस्वी होईल.”

“आज बऱ्याच लोकांना असे वाटेल की, पुरुषांना भावना असतात आणि महिलांनाही अहंकार असतो, पण हा सल्ला माझ्यासाठी खूप कामी आला आहे. मला वाटते की, दीर्घकालीन नातेसंबंध हे सर्वात आव्हानात्मक गोष्टी आहेत आणि तिथे तुम्हाला मित्रांची आवश्यकता आहे. कारण- जर तुम्ही तुमच्या जोडीदारावर सर्व काही लादले, तर तुम्ही नातेसंबंधावर खूप दबाव आणाल”, असं सोहा अली खान म्हणाली.

सोहाबरोबर नेहा धुपियादेखील या संभाषणात सहभागी झाली होती. अभिनेत्रीने सांगितले की, जेव्हा तिने अंगद बेदीशी लग्न केले तेव्हा सोहाने तिला सल्लाही दिला होता. नेहा म्हणाली, “सोहाने मला सांगितले की, पुरुषांचा अहंकार खूप नाजूक असतो. म्हणून तुम्ही काय बोलता याकडे लक्ष दिले पाहिजे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्याच संभाषणात, सोहाने शर्मिला टागोर यांच्या काम करण्याबद्दलही सांगितले. मन्सूर अली खान पतौडी (टायगर पतौडी) यांच्याबरोबर लग्न केल्यानंतर आणि मुले झाल्यानंतरही शर्मिला काम करत राहिल्या. सोहा म्हणाली, “कधी कधी माझी आई माझ्या भावाला आठवडाभर भेटत नसे. सैफ म्हणायचा, “मला तुझी गरज नाही. मला तू नकोय. कारण- तोही नाराज होता. मग ती तिच्या मुलांबरोबर कमी वेळ घालवत असल्याबद्दल तणावात असायची.”