Sonam Kapoor Hiding Baby Bump Video Viral : सोनम कपूर तिच्या दुसऱ्या प्रेग्नेंसीच्या बातम्यांमुळे चर्चेत आहे. अलीकडेच तिला तिचे आई-वडील अनिल कपूर आणि सुनीता कपूर यांच्या घरी करवा चौथ साजरा करण्यासाठी पाहिले गेले. यावेळी सोनम कपूर तिचा बेबी बंप लपवताना दिसली.

प्रेग्नंसीची बातमी समोर आल्यानंतर सोनम पहिल्यांदा स्पॉट झाली. तिच्या स्पॉट होण्याचं निमित्तं ठरलं करवा चौथ. सोनम कपूर करवा चौथसाठी तिचे वडील अनिल कपूर यांच्या घरी पोहोचली.

लाल आणि गुलाबी साडी परिधान केलेली सोनम खूपच सुंदर दिसत होती. यावेळी ती साडीचा पदर सावरत तिचा बेबी बंप लपवताना दिसली. सोनमचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

व्हायरल व्हिडीओमध्ये सोनम तिच्या गाडीच्या आत बसलेली दिसत आहे. ती पापाराझींसाठी पोज देण्यासाठी गाडीतून बाहेर पडली नाही, तर आतूनच पोज देत होती. यादरम्यान, ती तिच्या हातांनी आणि फोनने तिचा बेबी बंप लपवत असल्याचे दिसून आले. वृत्तानुसार, सोनमच्या टीमच्या सदस्यांनी कारमधून बाहेर पडण्यापूर्वी पापाराझींना त्यांचे कॅमेरे बंद करण्यास सांगितले. अफवांच्या मते, अभिनेत्री तिच्या दुसऱ्या तिमाहीत आहे.

सोनम कपूरने अद्याप तिच्या दुसऱ्या प्रेग्नंसीची बातमी अधिकृतपणे सांगितलेली नाही. मे २०१८ मध्ये आनंद अहुजा आणि सोनम यांनी लग्न केलं. दोघांना २०२२ मध्ये वायु हा पहिला मुलगा झाला. पिंक व्हिलाच्या वृत्तानुसार, सोनम दुसऱ्यांदा प्रेग्नंट असून ती लवकर प्रेग्नंसीची बातमी सर्वांना सांगणार आहे.

सोनमने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर करवा चौथच्या लूकचे फोटोही शेअर केले आहेत. करवा चौथसाठी सोनम कपूर लाल-गुलाबी बनारसी साडीमध्ये खूपच सुंदर दिसत होती.

अलीकडेच, सोनमने तिची चुलत बहीण अंशुला कपूरच्या साखरपुड्यालाही हजेरी लावली होती, तिथेही तिने पापाराझींना फोटो देण्यास नकार दिला होता.