अभिनेता सोनू सूदचा आज वाढदिवस आहे. सोनूने आजवर त्याच्या अभिनयाने बॉलिवूडमध्ये स्वत:च स्थान निर्माण करत प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे. सोनूने बॉलिवूडमधील अनेक बड्या कलाकारांसोबत स्क्रीन शेअर केलीय. खास करून बच्चन कटुंबियातील बिग बी अमिताभ बच्चन तसचं अभिषेक आणि ऐश्वर्या या तिघांसोबत वेगवेगळ्या सिनेमांमधून सोनूने काम केलंय. २०१३ सालात दिलेल्या एका मुलाखतीत सोनूने बच्चन कुटुंबियांसोबत काम करण्याचा त्याचा अनुभव सांगितला होता.
या मुलाखतीत सोनूला बच्चन कुटुंबियातील त्याचा आवडता कलाकार कोण आहे? असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर सोनूने अर्थाच सर्वात पहिलं नाव बिग बींचं घेतलं. तो म्हणाला, “मला बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्यात सर्वात जास्त मजा आली. बुड्ढा होगा तेरा बाप या सिनेमात त्यांनी माझ्या वडिलांची भूमिका साकारली होती. यावेळी त्यांच्या सोबत काम करण्याचं दडपण आलं होतं. मी दिग्दर्शकाला म्हणालो देखील की ज्या व्यक्तीचा लहानपणा पासून आदर करत आलोय त्यांच्यासोबत कसं काम करू शकतो.” असं सोनू म्हणाला. तसंच बिग बी शूटिंगवेळी व्हॅनमध्ये न बसता सेटवरच बसू राहणं पसंत करतात. ते त्यांच्या संवाद वाचून सराव करत असतात असं सोनूने सांगितलं.
View this post on Instagram
हे देखील वाचा:Raj Kundra Case: “मला न्यूड ऑडिशन देण्यास सांगितलं”; मॉडेल झोया राठोडचा खुलासा
तर सोनूने अभिषेकसोबत काम करण्याचा अनुभवही सांगितला होता.”अभिषेक जसा दिसतो तसाच आहे. तो दिखावा करत नाही.” असं सोनू म्हणाला. तर ऐश्वर्या रायसोबत सोनूने ‘जोधा अकबर’ सिनेमात काम केलं होतं. या सिनेमात त्याने ऐश्वर्या रायच्या भावाची भूमिका साकारली होती. ऐश्वर्याबद्दल सांगताना सोनू म्हणाला, “सुरुवातीला ऐश्वर्या खूप रिजर्व होती फार बोलत नव्हती. मात्र एका सीननंतर ती मोकळेपणाळे बोलू लागली ती मला म्हणाली, ‘तू मला माझ्या पाची आठवण करून देतो. ती मला आजही भाई साहब बोलते.” असं म्हणत सोनूने ऐश्वर्यासोबत काम करण्याचा अनुभव सांगितला.
करोना काळात सोनू सूद हा अनेकांसाठी देवदूत ठरला आहे. सोनू सूदने गरुजुंसाठी मदतीचा हात पुढे करत त्याच्या मनाचा मोठेपणा दाखवून दिला आहे. बेरोजगारांना रोजगार मिळवून देणं असो वा एखाद्या रुग्णाला ऑक्सीजन सोनू सूद आणि त्याच्या टीमने गेल्या वर्षभरात अनेकांची मदत केली आहे.