नो सिंगल कट! ‘सूर्यवंशी’ चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाचा ग्रीन सिग्नल

अखेर येत्या ४ नोव्हेंबरला हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित केला जाणार आहे.

अभिनेता अक्षय कुमारचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट म्हणजे ‘सूर्यवंशी’. येत्या ५ नोव्हेंबरला ‘सूर्यवंशी’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे. नुकतंच या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाकडून ग्रीन सिग्नल मिळाला आहे. सीईओ रविंद्र भाकड यांनी कोणतीही कात्री न लावता U/A सर्टिफिकेट दिले आहे. हा चित्रपट १४५ मिनिटांचा आहे.

शुक्रवारी १५ ऑक्टोबरला दसऱ्याच्या शुभमुहर्तावर सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टीफिकेशन (CBFC) सीईओ रविंद्र भाकड यांना ‘सूर्यवंशी’ चित्रपट दाखवण्यात आला. हा चित्रपट पाहिल्यानंतर सेन्सॉर बोर्डाकडून त्याला U/A सर्टिफिकेट मिळाले आहे. तसेच या चित्रपटातील कोणाताही सीन वगळला किंवा कापला जाणार नाही, असेही सेन्सॉर बोर्डाने सांगितले आहे.

येत्या २१ ऑक्टोबरपासून ‘सूर्यवंशी’ चित्रपटाच्या प्रमोशनला सुरुवात होणार आहे. यादिवशी मोठे प्रमोशन केले जाणार आहे. याच दिवशी चित्रपटातील एक गाणेही लाँच केले जाणार आहे. या गाण्यात अक्षय कुमार, अजय देवगण आणि रणवीर सिंह हे तिघेही दिसणार असल्याचे बोललं जात आहे. हा चित्रपट १४५ मिनिटांचा आहे.

तर दुसरीकडे ‘सूर्यवंशी’ चित्रपटातील दुसरे गाणे हे २४ ऑक्टोबरला लाँच करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. हे गाणे अक्षय कुमार आणि कतरिना कैफ या दोघांवर चित्रित करण्यात आले आहे. दरम्यान ‘सूर्यवंशी’ चित्रपटाचा एक प्रोमो सध्या तुफान व्हायरल होत आहे. यात अक्षय कुमार, अजय देवगण आणि रणवीर सिंह हे तिघेही दिसत आहे. हा प्रोमो चित्रपटगृहात चित्रित करण्यात आला आहे. या तिन्ही अभिनेत्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करत चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेची घोषणा केली होती.

५ नोव्हेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार

‘सूर्यवंशी’ हा बहुप्रतिक्षित चित्रपट आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षक हा चित्रपट प्रदर्शित होण्याची वाट बघत आहे. मात्र कोरोनामुळे या चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात येत होती. अखेर येत्या ५ नोव्हेंबरला हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित केला जाणार आहे. या चित्रपटामध्ये अक्षय कुमारसोबत अजय देवगण आणि रणवीर सिंग मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. त्याचसोबत बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Sooryanvanshi gets u a certificate by censor board cleared with zero cuts song to release on 21 october nrp

Next Story
नाट्यरंग : ‘चित्रगोष्टी’ : चित्रं अन् जगण्याचं अन्योन्य नातं!
ताज्या बातम्या