scorecardresearch

वडिलांच्या निधनानंतर २० व्या दिवशी महेश बाबू लागला कामाला; ट्वीट करत म्हणाला…

‘बॅक टू वर्क’ असा कॅप्शन देत त्याने आपला नवा फोटो शेअर केला आहे

वडिलांच्या निधनानंतर २० व्या दिवशी महेश बाबू लागला कामाला; ट्वीट करत म्हणाला…
फोटो सौजन्य : इंडियन एक्सप्रेस

दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबूचे वडील कृष्णा घट्टामनेनी यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी समजताच दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत शोकाकुल वातावरण होते. हृदयविकाराचा झटका आल्याने वयाच्या ७९ व्या वर्षी त्यांचं निधन झालं आहे.काहीच महिन्यांपूर्वी महेश बाबूच्या आईचेही निधन झाले होते, त्यानंतर काहीच महिन्यात वडिलांचं जाणं हे महेश बाबूसाठी फार धक्कादायक आहे, मात्र तरीही आता महेश भाऊ धक्क्यातून सावरत सज्ज झाला आहे.

महेश बाबू दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतला आघाडीचा अभिनेता, आजवर त्याचे चाहते फक्त दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीपुरते मर्यादित नाहीत तर पूर्ण देशात चाहते आहेत. वडिलांच्या जाण्याने तो जरी खचला असला तरी त्याने आता आपल्या कामाला सुरवात केली आहे. आपल्या ट्वीटवर अकाऊंटवरून त्याने ही माहिती शेअर केली आहे.

सोनम कपूर परतली कामावर, लेकाच्या आठवणीत शेअर केला व्हिडीओ, म्हणाली…

‘बॅक टू वर्क’ असा कॅप्शन देत त्याने आपला नवा फोटो शेअर केला आहे. त्याचे चाहतेदेखील त्याचे अभिनंदन करत आहेत. एकाने लिहले आहे तुला ‘कामावर परत पाहून आनंद झाला. आपले काम सर्व काही ठीक करून जाते.’ दुसऱ्याने लिहले आहे ‘सर्वकाही ठीक होईल, अभिनंदन,’ तिसऱ्याने लिहले आहे ‘आयुष्य चालत राहणार देव हे जग सोडून गेले आहेत, परंतु ते सदैव तुमच्या आणि तुमच्या कुटुंबासोबत असतील, तुमच्यावर लक्ष ठेवतील, तुम्हाला आशीर्वाद देतील,’ असा शब्दात नेटकऱ्यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.

महेशच्या आगामी चित्रपटांच्याबाबतीत बोलायचं झालं तर ‘RRR’ दिग्दर्शक एसएस राजामौली यांच्या आगामी चित्रपटात तो दिसणार आहे. तेलगू दिग्दर्शक त्रिविक्रमच्या आगामी चित्रपटात तो दिसणार आहे. हा चित्रपट २०२३ साली प्रदर्शित होईल.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-12-2022 at 15:32 IST

संबंधित बातम्या