कलाविश्वातील सर्वाधिक मानाच्या मानल्या जाणाऱ्या ९५व्या अकादमी अवॉर्डची घोषणा सोमवारी(१३ मार्च) करण्यात आली. यंदाचा ऑस्कर भारतासाठी खास ठरला. ‘द एलिफंट व्हिसपर्स’ या शॉर्ट फिल्मला ‘बेस्ट डॉक्युमेंट्री शॉर्ट फिल्म’ या कॅटेगरीत अवॉर्ड मिळाला. याबरोबरच बहुचर्चित एस.एस.राजामौली यांच्या ‘आरआरआर’ चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्यालाही ऑस्कर मिळाला.
नाटू नाटूला ‘बेस्ट ओरिजिनल साँग’ या श्रेणीत पुरस्कार मिळाला आहे. पहिल्यांदाच भारताला एका गाण्याने ऑस्कर मिळवून दिला आहे. ‘नाटू नाटू’ला ऑस्कर मिळाल्यानंतर सर्वच स्तरातून यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. ऑस्कर मिळाल्यानंतर सोशल मीडियावर पुन्हा या गाण्याचे रील्स व्हायरल होताना दिसत आहेत.
हेही वाचा>> “किरणजी, मी बारामतीहून सुनेत्रा पवार बोलतीये”, अजित पवारांच्या पत्नीने किरण मानेंना फोन केला अन्…
\ऑस्कर मिळाल्यानंतर नाटू नाटू गाणं गुगलवर ट्रेंड झालं होतं. एका जपानी साईटने दिलेल्या वृत्तानुसार, ऑस्कर जिंकल्यानंतर गुगलवर नाटू नाटू गाण्याचे सर्च ११०५ टक्क्यांनी वाढलं आहे. नाटू नाटूला ऑस्कर जाहीर झाल्यानंतर सोशल मीडिया सर्चमध्ये १० टक्क्यांनी वाढ झाली आहे.
राजामौली दिग्दर्शित आरआरआर चित्रपट मार्च २०२२ मध्ये प्रदर्शित झाला होता. देशाबरोबरच संपूर्ण जगात या चित्रपटाची क्रेझ होती. राम चरण व ज्युनिअर एनटीआर मुख्य भूमिकेत असलेल्या या चित्रपटाने कोटींची कमाई केली.