‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाची सगळीकडेच जोरदार चर्चा आहे. चित्रपटाची तिकीटविक्री पाहता या चित्रपटाकडून प्रेक्षकांना खूप अपेक्षा आहेत. चित्रपटसृष्टीतल्या बऱ्याच लोकांनी या ‘ब्रह्मास्त्र’ला पाठिंबा दर्शवला आहे. एकूणच बॉयकॉट ट्रेंडमुळे ‘ब्रह्मास्त्र’ आणि त्यातल्या कलाकारांना बरंच ट्रोल केलं जात आहे. आता याबद्दल स्टँड अप कॉमेडीयन अतुल खत्री याने भाष्य केलं आहे.

अतुल खत्री हे स्टँड अप कॉमेडीमधलं बरंच मोठं नाव आहे. त्याच्या कार्यक्रमांना लोकांचा उत्तम प्रतिसाद मिळतो आणि त्यांचे व्हिडिओज सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत असतात. नुकतंच अतुल खत्री यांनी ट्विटरच्या माध्यमातून ‘ब्रह्मास्त्र’ आणि ‘द कश्मीर फाईल्स’ यांच्यावर टिप्पणी केली आहे. त्यांनी ट्वीट करत म्हंटलं आहे की. “चित्रपटाचं नाव बदलून ब्रह्मास्त्र फाईल्स ठेवा, भक्तमंडळी तो चित्रपट पाहतील.”

अतुल खत्री यांच्या ट्वीटला दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनीही त्यांच्या खास शैलीत उत्तर दिलं आहे. अतुल खत्री यांचं ट्वीट शेअर करत ते म्हणाले की, “तुझं नावही बदलून अतुल संत्री कर, त्यानिमित्ताने तरी तुला काम मिळेल.” या दोघांच्या ट्वीटवर लोकांच्याही भन्नाट प्रतिक्रिया आल्या आहेत.

आणखी वाचा : बॉयकॉट ट्रेंडबद्दल ट्वीट केल्याने अभिनेत्री स्वरा भास्कर ट्रोलर्सच्या निशाण्यावर; म्हणते “बॉयकॉट बॉलिवूड हा तर…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

९ सप्टेंबर रोजी ब्रह्मास्त्र चित्रपटगृहात झळकणार आहे. चित्रपटसृष्टीतल्या तज्ञांच्या मते हा चित्रपट पहिल्या दिवशी २५ कोटींची कमाई करू शकतो आणि या विकेंडला हा चित्रपट ७५ कोटींचा व्यवसाय करू शकतो. ५ वेगवेगळ्या भाषेत हा चित्रपट प्रदर्शित होणार असून प्रेक्षक यासाठी चांगलेच उत्सुक असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे.