मुनव्वर फारुकी हा स्टँडअप कॉमेडियन कायम सोशल मीडियावर चर्चेत असतो. त्याची वादग्रस्त वक्तव्य, स्टँड अप शोमध्ये त्याने कित्येकांची उडवलेली खिल्ली यामुळे मध्यंतरी त्याला तुरुंगातदेखील टाकण्यात आलं होतं. मुनव्वर हा त्याच्या सडेतोड स्वभावासाठी सर्वात जास्त ओळखला जातो. नुकताच बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत त्याने मनमोकळ्या गप्पा मारल्या आहेत. याच मुलाखतीमध्ये त्याने बॉलिवूड स्टार शाहरुख खानविषयी खुलासा केला आहे.

या मुलाखतीमध्ये त्याला प्रश्न विचारला गेला, की “तू शाहरुख खानला कधीच ट्रोल का करत नाहीस?” यावर मुनव्वरने उत्तर दिलं की “शाहरुख खानबद्दल माझ्या मनात प्रचंड आदर आहे. शिवाय त्यांचा हजरजबाबीपणा मला प्रचंड आवडतो. ते ज्या पद्धतीने बोलतात आणि समोरच्या माणसाच्या मनावर पकड घेतात हे मला खूप आवडतं. शिवाय ते थिएटर आर्टिस्ट असल्याने त्यांच्याविषयी माझ्या मनात एक वेगळीच जागा आहे. म्हणूनच मी कधीच माझ्या शोमध्ये शाहरुख खानवर विनोद करूच शकत नाही.”

करण जोहरने कियारा आडवाणीला विचारला सिद्धार्थ मल्होत्राबद्दल प्रश्न, उत्तर देताना म्हणाली “मला लग्न…”

मुनव्वरला लोकांनी मध्यंतरी ‘लॉक अप’ या रिऍलिटी शोमधून पाहिलं आहे. या शोचा विजेता हा मुनव्वरच होता. कंगना रनौत या अभिनेत्रीने या शोचं सूत्रसंचालन केलं होतं. टीव्हीवर नव्हे तर हा कार्यक्रम एमएक्स प्लेअर या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला होता.

या कार्यक्रमात पूनम पांडे, अंजली अरोरा, सुनील पाल, पायल रोहतगी असे कलाकारदेखील पाहायला मिळाले होते. हा शो जिंकल्यानंतर मुनव्वर रोहित शेट्टीच्या ‘खतरों के खिलाडी’मध्ये भाग घेणार होता. काही कारणास्तव मुनव्वरने यात भाग घेण्यास नकार दिला आहे.