पुन्हा: एकदा ‘खलनायक’

‘खलनायक’ या सुपरहिट चित्रपटाचे पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पुनरागमन होण्याची शक्यता आहे. संजय दत्त, माधुरी दीक्षित आणि जॅकी श्रोफ यांची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट १९९३ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खळबळ माजवली होती.

प्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक सुभाष घई या चित्रपटाचा सिक्वल किंवा रिमेक बनविण्याचा विचार करत आहेत. घई यांनी ‘पीटीआय’ला सांगितले,  आम्ही खलनायक चित्रपटासाठी काही योजना आखत असून, त्यावर काम सुरू आहे. या चित्रपटासाठी काही दिग्दर्शकांची नावे आमच्या नजरेसमोर असून, लवकरच याबाबत घोषणा  करण्यात येईल. या पेक्षा जास्त आता काही सांगता येणे शक्य नाही. त्याचप्रमणे चित्रपटाच्या कथेचे सादरीकरण आधुनिक पद्धतीने करण्याचा विचार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Subhash ghai plans remake of sanjay dutts khalnayak

ताज्या बातम्या