वेब सीरिज आणि सुमित व्यास हे समीकरण जणू ठरलेलंच आहे. ‘परमनंट रुममेट्स’, ‘ट्रिपलिंग’ या वेब सीरिजमधून झळकलेला अभिनेता सुमित व्यास अनेकांच्या आवडत्या अभिनेत्यांपैकी एक आहे. सुमित व्यासने अभिनयाच्या जोरावर स्वत:चा असा वेगळा चाहता वर्ग निर्माण केला आहे. नुकताच ‘वीरे दी वेडिंग’ या चित्रपटात झळकलेला या अभिनेत्याने त्याच्या प्रियसीबरोबर साखरपुडा केल्याचं समोर आलं आहे.

सुमितने प्रियसी एकता कौलबरोबर नुकताच साखरपुडा केला असून सूत्रांच्या माहितीनुसार, दोघंही १५ सप्टेंबर रोजी विवाहबंधनात अडकणार आहेत. विशेष म्हणजे सुमितने याविषयी एका मुलाखतीमध्ये उलगडा केला आहे.

Unbeatable filter #happyfilter #nofilter

A post shared by Sumeet Vyas (@sumeetvyas) on

‘एकता साधी आणि सरळमार्गी मुलगी आहे. तिचा हाच स्वभाव पाहून मी काही दिवसापूर्वी लग्नासाठी तिच्याकडे विचारणा केली होती. खरंतर तिचा निर्णय बदलण्यापूर्वीच मी तिच्या बोटांमध्ये अंगठी घातली. मात्र यात एक घोळ झाला, मी जी अंगठी आणली होती ती चुकीच्या मापाची होती. माप चुकलं असलं तरीदेखील एकताने माझ्या अंगठीचा स्वीकार केला आणि तिच्याही प्रेमाची कबूली दिली’, असं सुमितने सांगितलं.

पुढे तो असंही म्हणाला, ‘माझ्या कुटुंबियांनीही एकताचा स्वीकार केला आहे. तिच्या घरातल्यांची आम्ही काश्मीरमध्ये भेट घेतली आणि आमच्या लग्नाबद्दल सारं निश्चित करण्यात आलं. आमचं लग्नदेखील काश्मिरीच्या पारंपारिक पद्धतीने होणार आहे’.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, सुमित व्यास काही दिवसापूर्वी ‘वीरे दी वेडिंग’ या चित्रपटामध्ये झळकला होता. त्यानंतर आता त्याच्या पदरात आणखी एक वेबसीरिज पडली असून तो नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘इट्स नॉट सिंपल’ या वेब सीरिजच्या दुसऱ्या सीझनमध्ये तो झळकणार आहे.