बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी सध्या तिच्या आगामी ‘शेरो’ या तमिळ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाच्या सेटवरचा एक व्हिडीओ तिने इन्स्टाग्रामवर शेअर केलाय. या व्हिडिओमध्ये सनी लिओनी मस्ती करताना एका व्यक्तीला मारण्यासाठी हातात ट्रायपॉड उचलताना दिसून येतेय. तिच्या या मस्तीत आणखी एक व्यक्ती एन्ट्री करतो आणि प्रकरण मिटवून टाकताना दिसून येतोय. हा व्हिडीओ पाहून सनी लिओनीनचे चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. हा व्हिडीओमध्ये सनी लिओनी भांडण करते की काय असं वाटू लागतं. पण हा व्हिडीओ कोणत्याही भांडणाचा नसून तिच्या नव्या चित्रपटाच्या सेटवर एक सीन रिक्रीएट करताना केलेल्या मस्तीचा आहे. सनी लिओनीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.

सनी लिओनी आगामी प्रोजेक्ट एक तमिळ चित्रपट आहे. ‘शेरो’ असं तिच्या या नव्या चित्रपटाचं नाव आहे. नेहमीच आपल्या ग्लॅमरस आणि बॉब्मशेल भूमिकांमधून झळकणारी अभिनेत्री सनी लिओनी या नव्या चित्रपटातून एक वेगळ्या अंदाजमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामूळे ‘शेरो’ चित्रपटात तिचा नवा अंदाज पाहण्यासाठी चाहते आतुरले आहेत. काही दिवसांपूर्वीच तिच्या ‘शेरो’ चित्रपटाचं पोस्टर रिलीज करण्यात आलंय. या पोस्टरमध्ये सनी लिओनी ग्लॅमरस आऊटफिटमध्ये नव्हे तर जखमी नायिकेच्या लूकमध्ये दिसून आली. हा चित्रपट तमिळ भाषेसोबतच हिंदी, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड भाषेत देखील रिलीज करण्यात येणारेय.

सनी लिओनी तिच्या या नव्या चित्रपटातील सहकाऱ्यांसोबत मजा करताना दिसतेय. या व्हिडीओमधला सनीचा मजेदार मूड तिच्या चाहत्यांना खूपच आवडला आहे. या व्हिडीओमध्ये वेगाने धावत येत असलेला एक व्यक्ती खिडकीच्या आत जाण्याचा प्रयत्न करतो, पण सनी बाजुलाच पडलेला ट्रायपॉड उचलून त्याची धुलाई करताना दिसून येतेय. तिला राग पाहून नंतर एक व्यक्ती येतो आणि तिला शांत करण्याचा प्रयत्न करतो. हा व्हिडीओ शेअर करताना सनीने एक कॅप्शन देखील लिहिलीय. “हितेंद्र कपोपाराला सनीराजनी माझ्यापासून कायमच दूर ठेवण्याची गरज आहे!’ असं लिहित तिने हा व्हिडीओ शेअर केलाय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sunny Leone (@sunnyleone)

सनीचा हा व्हिडिओ पाहून चाहते मात्र आनंद घेत आहेत, तर दुसरीकडे सनी लिओनीचा अशी मस्ती पाहून काहींना आश्चर्य वाटतंय. याआधी सनी लिओनीने आणखी एक व्हिडिओ शेअर केला होता, ज्यात तिच्या चेहऱ्यावर दुखापतीच्या खुणा दिसत होत्या. सनी लिओनीने शेअर केलेल्या या धमाकेदार व्हिडीओला अवघ्या 4 तासात तब्बल 1 लाखांहून अधिक चाहत्यांनी लाइक केलं आहे.

आणखी वाचा: आईच्या निधनाने कोलमडून गेला होता अर्जुन कपूर; स्वतःला सावरण्यासाठी…

‘शिरो’ हा एक सायको थ्रिलर चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन श्रीजीत विजयन यांनी केले आहे. याशिवाय ती विक्रम भट्टच्या वेब सीरिज ‘अनामिका’ मध्येही दिसणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, सनी ‘द बॅटल ऑफ भीमा कोरेगाव’ या पिरियड ड्रामामध्येही काम करत आहे. ती MTV च्या शो Splitsvilla 3 चं शूटिंग देखील करत आहे.