Sunny Sanskari Ki Tulsi Kumari Box Office Collection Day 1 : ‘सनी संस्कारी की तुलसी कुमारी’ हा चित्रपट २ ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित झाला. या चित्रपटात वरुण धवनबरोबर जान्हवी कपूर आहे, ज्यांनी यापूर्वी ‘बवाल’मध्ये एकत्र काम केले होते. या चित्रपटात रोहित सराफ व सान्या मल्होत्रा देखील आहेत आणि त्याचे दिग्दर्शन शशांक खेतान यांनी केले आहे.
या रोमँटिक कॉमेडी चित्रपटाची टक्कर ऋषभ शेट्टीच्या ‘कांतारा : चॅप्टर १’शी झाली. दोन्ही चित्रपटांच्या पहिल्या दिवशीच्या कलेक्शनमध्ये लक्षणीय फरक आहे. चला जाणून घेऊया ‘सनी संस्कारी की तुलसी कुमारी’ने पहिल्या दिवशी किती कमाई केली.
‘सनी संस्कारी की तुलसी कुमारी’ने पहिल्या दिवशी किती कमाई केली?
‘सनी संस्कारी की तुलसी कुमारी’ला दसऱ्याच्या सुटीचा फायदा झाला. ‘सनी संस्कारी की तुलसी कुमारी’ने चांगली सुरुवात केली आहे. ‘सॅकनिल्क’च्या मते, ‘सनी संस्कारी की तुलसी कुमारी’ने पहिल्या दिवशी ९.२५ कोटींची कमाई करीत दमदार सुरुवात केली. जगभरात हा आकडा १५ ते २० कोटी रुपये इतका असल्याचे सांगितले जात असले तरी चित्रपट अजूनही ८० कोटींच्या बजेटपासून खूप दूर आहे. चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये आठवड्याच्या शेवटी वाढ होण्याची अपेक्षा आहे. ‘सनी संस्कारी की तुलसी कुमारी’ हा २०२५ चा दुसरा सर्वाधिक ओपनिंग करणारा रोमँटिक चित्रपट ठरला आहे. त्याने ‘परम सुंदरी’, ‘भूल चुक माफ’ यांसारख्या चित्रपटांना मागे टाकले आहे.
वरुण धवन आणि जान्हवी कपूर हे ‘सनी संस्कारी की तुलसी कुमारी’पूर्वी अॅमेझॉन प्राइमवरील ‘बवाल’ चित्रपटात दिसले होते. त्या चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद मिळाला. ‘सनी संस्कारी की तुलसी कुमारी’बद्दल बोलायचे झाले तर, चित्रपटाची गाणी सोशल मीडियावर ट्रेंड करीत आहेत, प्रेक्षकांना ‘बिजुरिया’ हे गाणे खूप आवडले आहे. वीकेंड सुरू असल्याने, चित्रपट ‘कांतारा २’पेक्षा जास्त कमाई करू शकतो का हे पाहणे बाकी आहे.
‘सनी संस्कारी की तुलसी कुमारी’ या चित्रपटात वरुण धवन, जान्हवी कपूर, सान्या मल्होत्रा, रोहित सराफ, मनीष पॉल व अक्षय ओबेरॉय हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.