Entertainment News Today 25 April 2025 : पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याबद्दल अभिनेत्री हिना खानने पोस्ट केली आहे. मूळची काश्मिरी असलेल्या हिनाने सर्व हिंदूंची माफी मागितली आहे. तसेच विवियन डिसेनाने कोणताही धर्म हिंसा शिकवत नसल्याचं म्हटलं आहे. बिग बॉस मराठीचा विजेता सूरज चव्हाण याचा पहिला चित्रपट ‘झापूक झुपूक’ रिलीज झाला आहे. मनोरंजनविश्वातील आजच्या सर्व ताज्या घडामोडी जाणून घ्या एका क्लिकवर…
Entertainment News Updates Today : मनोरंजन न्यूज अपडेट
सिद्धार्थ मल्होत्रासह झळकली 'ही' मराठमोळी अभिनेत्री! साध्याभोळ्या नायिकेचा पहिल्यांदाच दिसला बोल्ड अंदाज, पाहा व्हिडीओ
"बाई वाड्यावर या असं बाबांनी एकाही चित्रपटात म्हटलेलं नाही", गार्गी फुलेंचं भाष्य, म्हणाल्या, "त्यांची प्रतिमा…"
शिवाजी साटम यांच्या एक्झिटनंतर CID मध्ये एंट्री; ट्रोलिंगबद्दल पार्थ समथान म्हणाला, "वाईट वाटलं अन्…"
"दारूच्या व्यसनाने त्याला संपवलं," एक्स पतीच्या निधनाबद्दल मराठमोळ्या अभिनेत्रीचं वक्तव्य; अडीच महिन्यांपूर्वी झाला घटस्फोट
माधुरी दीक्षितचे सासू-सासरे 'त्या' निर्णयावर झालेले नाराज! डॉ. नेनेंनी अमेरिकेतील 'हार्ट सर्जन'ची नोकरी सोडली अन्…
"स्क्रीन टेस्टही झाली होती; पण…", रणबीर कपूरच्या 'रामायण'मधून पत्ता कट झाल्यावर प्रसिद्ध अभिनेत्रीचं वक्तव्य
"दुर्दैवाने मराठी इंडस्ट्रीत कौतुकाचा तुटवडा", मराठी अभिनेत्याचं स्पष्ट वक्तव्य; म्हणाले, "फूटपाथ हे माझं झोपण्याचं ठिकाण होतं…"
Aamir Khan on Pahalgam Attack : आमिर खानला पहलगाम हल्ल्यामुळे बसलाय धक्का
Aamir Khan on Pahalgam Attack : 'अंदाज अपना अपना' हा चित्रपट आज ३१ वर्षांनी २५ एप्रिलला पुन्हा रिलीज झाला. पण या चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंगमध्ये बॉलीवूड अभिनेता आमिर खान गैरहजर होता. पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे आमिर खूप दु:खी असल्याने तो स्क्रिनिंगला आला नाही.
आमिर खान म्हणाला, "मी काश्मीरमधील पहलगाममध्ये घडलेल्या घटनेच्या बातम्या वाचत होतो. निष्पाप लोकांच्या हत्येमुळे मला खूप दु:ख झालं आहे. त्यामुळे मी प्रिव्ह्यूला जाऊ शकलो नाही. मी चित्रपट या वीकेंडला कधीतरी बघेन."
रितेश देशमुखच्या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान नदीत बुडालेल्या डान्सरचा मृतदेह २ दिवसांनी सापडला
जान्हवीला 'ती' चूक महागात पडणार! सुधारलेल्या जयंतने पुन्हा दाखवलं विकृत रुप; 'लक्ष्मी-निवास' मालिकेत पुढे काय घडणार? पाहा प्रोमो
ती रांगत त्याच्या खोलीकडे…; प्रसिद्ध अभिनेत्रीने केलेलं 'असं' काही की…, गमवावा लागलेला चित्रपट
"निसर्गाचा विध्वंस सुरू आहे आणि…", प्रियदर्शिनी इंदलकरने शेअर केला व्हिडीओ; पुण्यातील नदी शुद्धीकरणासाठी केली पोस्ट
"तब्बल १२ ते १५ वर्षांनंतर…", 'झापुक झुपूक' फेम अभिनेत्रीने शेअर केली खास पोस्ट, म्हणाली, "हा चित्रपट खास आहे कारण…"
मुंबईत काम करीत असूनही देवदत्त नागे अलिबागमध्येच का राहतो? अभिनेत्याने सांगितलं कारण, म्हणाला…
निर्मात्याला घरी बोलावलं, मटण खाऊ घातलं अन्…; परेश रावल यांनी सांगितला नाना पाटेकरांचा किस्सा, खुलासा करीत म्हणाले, "१ कोटी रुपये…"
"मंदार जाधव व गिरिजा प्रभू मराठीतील…", वैभव मांगले यांचं वक्तव्य; म्हणाले, "दोघांच्याही डोक्यात हवा नाही…"
Vivian Dsena on Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्याबद्दल विवियन म्हणाला...
Vivian Dsena on Pahalgam Terror Attack : ख्रिश्चन धर्म सोडून इस्लाम स्वीकारणारा लोकप्रिय अभिनेता विवियन डिसेना यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. "ही हृदय पिळवटून टाकणारी बातमी मला अजूनही पचवता आलेली नाही. जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये पर्यटनासाठी गेलेल्या निष्पाप लोकांना जीव गमवावा लागला. हे दुःखद आहे. पीडित कुटुंबांसाठी मला प्रचंड त्रास होत आहे. कोणताही धर्म अशा हिंसेला परवानगी देत नाही किंवा शिकवत नाही. हे क्रूर आहे. अशा अमानवी कृत्याचा मी तीव्र निषेध करतो. जे जखमी झाले आहेत त्यांच्यासाठी मी प्रार्थना करतो. त्यांच्या कुटुंबीयांना हे दु:ख सहन करण्याची हिंमत मिळो. न्याय मिळायला पाहिजे," असं विवियन पहलगाम हल्ल्याबद्दल म्हणाला.
"… आमचाही जीव गेला असता", प्रसिद्ध गायकाने पहलगाम येथील फोटो पोस्ट करीत व्यक्त केली हळहळ; म्हणाला, "त्यांना पकडून…"
Zapuk Zupuk Release Live Updates - आज गोदा माईचा आशीर्वाद मिळालाय
Zapuk Zupuk Release Live Updates - मित्रांनो आज मला वेगळचं सुख मिळालं, उद्या आपला पिक्चर रिलीज़ होतोय अन आज आपले सर, आणि मी तुमचा लाडका सूरज,आम्ही तिघांनी रामकुंड पंचवटी, नाशिकला जाऊन गोदा माईचं दर्शन घेतलं. खूप आनंदाने गोदा आरती केली…शांत वाटलं एकदम
आज गोदा माईचा आशीर्वाद मिळालाय
उद्यापासून तुम्हा आख्यांचाचं आशीर्वाद मिळेल हे नक्की…
कारण माझा तुमचा आख्यांवर विश्वास आहे…आणि तुम्ही मला गोलीगत धोका कधीच देणार नाही..
https://www.instagram.com/reel/DI1nXuzqTs-/?utm_source=ig_web_copy_link
Hina Khan on Pahalgam Attack - पहलगाममध्ये मारल्या गेलेल्या २६ निष्पाप लोकांच्या हत्येमुळे हिना खान खूप दुःखी आहे. मुस्लीम असलेल्या हिनाने या दहशतवादी हल्ल्याबद्दल सर्व हिंदू आणि भारतीयांची माफी मागितली आहे. हिना खानने इन्स्टाग्रामवर एक मोठी पोस्ट शेअर करून आपला राग व्यक्त केला आहेत. तसेच 'आजच्या काश्मीर'ची वास्तविकता सांगितली आहे.
"हा एक काळा दिवस आहे. मुस्लीम म्हणून मी माझ्या सर्व हिंदू बांधवांची आणि भारतीयांची माफी मागू इच्छिते. या हल्ल्यात लोकांनी जीव गमावल्याने एक भारतीय म्हणून मला प्रचंड दुःख झालं आहे. पहलगाममध्ये जे घडले ते मी विसरू शकत नाही. या घटनेचा माझ्यावर आणि माझ्या मानसिक स्थितीवर परिणाम झाला आहे. ज्यांनी आपले प्रियजन गमावले त्या सर्वांचे हे दुःख आहे. हीच वेदना प्रत्येक भारतीयाला वाटत आहे. त्यांना हे दु:ख सहन करण्याची शक्ती मिळो हीच मी प्रार्थना करते," असं हिना खान म्हणाली.
https://www.instagram.com/p/DI1j_7Yoj3V/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==
हिना खानची पहलगाम हल्ल्याबद्दल पोस्ट
जम्मू-काश्मीरमध्ये पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. या घटनेबाबत अभिनेत्री हिना खानने पोस्ट केली आहे.