बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे सध्या प्रचंड चर्चेत आहे. गेल्या काही काळात ती भाजपा सरकारवर सातत्याने टीका करत आहेत. परंतु यावेळी ती कुठल्याही वक्तव्यामुळे नव्हे तर ‘फ्लेश’ या नव्या वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. लक्षवेधी बाब म्हणजे भाजपावर टीका करणाऱ्या स्वराच्या ‘फ्लेश’ या सीरिजला काही भाजपा समर्थकांनीच पाठिंबा दिला आहे. या नव्या मैत्रीसाठी तिने भाजपा समर्थकांचे आभार मानले आहेत.

अवश्य पाहा – आमिर खान आठ दिवसांनी एकदा अंघोळ करायचा; कारण…

“मी कट्टर भाजपा समर्थक आहे. पण तुमची फ्लेश ही सीरिज मला खुप आवडली. या सीरिजच्या यशासाठी तुम्हाला भरपूर शुभेच्छा. पण आपल्यामध्ये अद्याप मैत्री झालेली नाही.” अशा आशयाचे ट्विट करुन काही भाजपा समर्थकांनी ‘प्लेश’ सीरिजची स्तुती केली. यावर स्वराने, “हा आजवरचा सर्वोत्कृष्ट मेसेज आहे. या शुभेच्छांबद्दल मनापासून आभार. आम्ही तुमच्या स्तुतीसोबत व मैत्री शिवाय राहू.” अशा आशयाचं ट्विट करुन आभार मानले. तिचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

अवश्य पाहा – “बॉलिवूडमध्ये ड्रग्स कोणी भरवत नाही”; कंगनाच्या आरोपांना श्वेता त्रिपाठीचं प्रत्युत्तर

‘फ्लेश’ या सीरिजची कथा रोजगाराच्या नावाखाली होणाऱ्या मानवी तस्करीवर आधारित आहे. एका तरुणीचं अपहरण केलं जातं. या तरुणीची केस राधा नौटियाल नावाच्या एका स्री पोलीस अधिकाऱ्याच्या हातात येते. राधा नौटियाल ही व्यक्तिरेखा स्वरा भास्करने साकारली आहे. या तरुणीला शोधण्यासाठी राधाने केलेले प्रयत्न या सीरिजमध्ये दाखवण्यात आले आहेत. स्वरा भास्कर व्यतिरिक्त अक्षय ओबेरॉय, युधिष्टीर, विद्या माळवदे, महिमा मकवाना यांसारखे अनेक दमदार कलाकार या सीरिजमध्ये झळकले आहेत.