बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर ही ती तिच्या बेधडक आणि स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. गेल्या अनेक दिवसांपासून ती तिच्या वादग्रस्त व्यक्तव्यामुळे चर्चेत आहे. सध्या सोशल मीडियावर ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे. अफगाणिस्तानमधल्या परिस्थितीवर तिने आपलं मत मांडलं होतं. त्यानंतर तिच्या विरोधात १४ हुन जास्ती गुन्हे दाखल  करण्यात आले आहेत. स्वरा लवकरच मर्डर मिस्ट्रीवर आधारित चित्रपटात प्रमुख भूमिका साकारताना दिसणार आहे. या साठी स्वराने आता मानसशास्त्रज्ञांची भेट घेतली आहे.

असे म्हंटले जाते की एखाद्या कलाकाराला त्या भूमिकेच्या खोलात जायचे असेल तर त्यासाठी त्याचा सखोल अभ्यास करावा लागतो. स्वरा भास्कर लवकरच एका मर्डर मिस्ट्रीवर आधारित एका चित्रपटात काम करणार आहे. स्वरा भास्कर या चित्रपटात इन्वेस्टिंगेटिंग ऑफिसरची भूमिका साकारताना दिसणार आहे. ही ऑफिसर एका सिरीयल किलरला पकडण्याचा प्रयत्न करत असते. तिच्या या भूमिकेचा अभ्यास करण्यासाठी स्वरा भास्कर ही मानसशास्त्रज्ञांची मदत घेत आहे. तिला जाणून घायचे आहे की एका सिरीयल किलरच्या डोक्यात नेमकं काय सुरू असते. त्यांची काय मानसिकता असते. या भूमिके बद्दल बोलतं असताना तिने सांगितले की, ‘मला असं वाटतं की प्रेक्षकांनी कनेक्ट करणे आवश्यक आहे, तसंच एकाद्या भूमिकेला समजण्यासाठी, त्याचा अभ्यास करणे गरजेचे आहे. त्यामुळे तुम्हाला ती भूमिका उत्तम प्रकारे साकारू शकतात.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Swara Bhasker (@reallyswara)

पुढे स्वराने सांगितलं की, आता प्रेक्षक माहीतगार झाला आहे. त्यांना त्या विषयाची माहिती अगोदर असते. त्यामुळे कोणती ही भूमिका साकारताना अभ्यास करणे महत्त्वाचे झाले आहे.” याआधी ‘अनारकली ऑफ आराहा’, ‘फ्लॅश’ सारख्या चित्रपटात स्वराच्या अभिनयाचे वेगवेगळे पैलू प्रेक्षकांना पाहायला मिळाले आहेत. अशा भूमिका साकारताना स्वरा फक्त एका गोष्टीची काळजी घेते की ती म्हणजे पुरेशी झोप. त्यामुळे तिला अशा भूमिका साकारायला सोपे जाते.