‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. ही मालिका गेल्या १३ वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेत असलेल्या प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. मालिकेत टप्पूची भूमिका साकारणारा राज अनादकत ही मालिका सोडणार असल्याचे म्हटले जाते. या मालिकेतील निर्माता असित कुमार मोदी यांनी देखील यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

रिपोर्टने दिलेल्या वृत्तानुसार, राजने मालिका सोडण्याचा निर्णय केला अस सांगण्यात येत आहे. २०१७ मध्ये भव्या गांधीने मालिका सोडल्यानंतर राजने ही भूमिका साकारली. राजने बऱ्याचवेळा ‘तारक मेहता…’च्या टीमसोबत ताळमेळ बसवण्याचा प्रयत्न केला आहे. आता त्याला या मालिकेत राहण्याची इच्छा नाही, एवढंच नाही तर मालिकेची टीम देखील त्याला थांबवण्याचे प्रयत्न करत नाही आहे. राज आणि मालिकेत जेठालालची भूमिका साकारणारे अभिनेते दिलीप जोशी यांच्यातही वाद सुरु असल्याचे म्हटले जाते. त्यानंतर राज आणि मालिकेतील बबीताजी म्हणजेच मुनमुन दत्तासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा सुरु आहेत.

आणखी वाचा : विकी-कॅटच्या नवीन घराचा अनुष्काला होतोय त्रास

आणखी वाचा : पहिल्यांदा वडिलांनीच दिला होता मद्याचा ग्लास आणि ४ बॉयफ्रेंड ठेवण्याचा सल्ला, ट्विंकलने केला होता खुलासा

दरम्यान, यावर राजने अजुनही कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. तर मालिकेचे निर्माते असित मोदी म्हणाले, राज मालिका सोडणार आहे या विषयी त्यांना कोणतीही माहिती मिळालेली नाही. तर दुसरीकडे चाहत्यांची इच्छा आहे की राज आणि निर्मात्यांमध्ये जे काही वाद आहेत ते लवकरच संपले पाहिजे.