When Salman Khan did Garba with Dayaben aka Disha Vakani Video Viral : गेल्या १७ वर्षांपासून ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. सुरुवातीपासूनच या शोमधील सर्व पात्रांना प्रेक्षकांनी खूप प्रेम दिले आहे. जेठालाल असो किंवा दयाबेन, सर्वांनाच प्रचंड प्रेम मिळाले आहे. दयाबेन बऱ्याच काळापासून शोमधून गायब आहे. दिशा वकानी शोमध्ये दिसली नसली तरी सलमान खानबरोबर गरबा करतानाचा तिचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे.
दयाबेन प्रेक्षकांची तसेच सलमान खानचीही आवडती आहे. सलमान खान एकदा ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’मध्ये त्याच्या ‘जय हो’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आला होता, जिथे त्याने दयाबेनबरोबर गरबा केला होता.
जेव्हा सलमान खान त्याच्या चित्रपटाचे प्रमोशन करत होता, तेव्हा त्याने मीडियाला सांगितले होते की दयाबेन ही त्याची आवडती व्यक्तिरेखा आहे. त्यावेळी दिशा वकानी ही भूमिका साकारत होती. शोमध्ये सलमान खान गोकुलधाम सोसायटीमध्ये आला तेव्हा दयाबेनने त्याचे स्वागत केले. तेव्हा तिने गरबा करण्यास सुरुवात केली. दयाबेनने गरबा सुरू केला तेव्हा सलमान खानही सामील झाला. सलमान आणि दयाबेनचा गरबा करतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
दयाबेन बऱ्याच काळापासून ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’मध्ये दिसली नाही. तिच्या मुलाच्या जन्मापासून ती या शोमध्ये दिसली नाही. असित मोदी यांनी दिशा वकानीला पुन्हा शोमध्ये आणण्यासाठी अनेक वेळा प्रयत्न केले आहेत, परंतु ती परत येऊ शकली नाही. निर्मात्याने आता खुलासा केला आहे की ते लवकरच एक नवीन दयाबेन घेऊन येणार आहेत.
दिशाला दोन मुलं असून ती सध्या तिच्या कौटुंबिक जीवनावर लक्ष केंद्रित करत आहे. ती मालिकेत परत कधी येणार, याची सतत विचारणा चाहत्यांकडून होत असते. दिशाचे फोटो सोशल मीडियावर सतत व्हायरल होत असतात.
‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ हा भारतातील सर्वात जास्त काळ चालणाऱ्या मालिकांपैकी एक आहे. हा शो गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. टीआरपीच्या शर्यतीत अव्वल येणे असो वा मालिका सोडलेल्या कलाकारांनी शोबद्दल केलेल्या वक्तव्यांमुळे, या कार्यक्रमाची मोठी चर्चा होताना दिसत आहे.