गेल्या आठवड्याभरापासून तनुश्री दत्तानं नानापाटेकरसह अन्य काही जणांवर केलेल्या आरोपांमुळे बॉलिवूडमधलं वातावरण ढवळून निघालं आहे. नाना पाटेकरनंतर दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री, कोरिओग्राफर गणेश आचार्यसह राज ठाकरे यांच्यावरही तिनं टीका केली. आता मात्र तिनं आपला मोर्चा अक्षय कुमार, फराह खान, साजिद नाडियाडवाला यांच्याकडे वळवला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

फराह खाननं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ‘हाऊस फुल ४’ टीमचा फोटो शेअर केला आहे. यात नाना पाटेकरदेखील आहेत. यामुळे नाराज झालेल्या तनुश्रीनं चित्रपटाच्या टीमवर टीका केली आहे. ‘माझ्यावर जी परिस्थिती ओढावली आहे, तिच तुमच्या मुलींवर आली तर? त्यांच्यावर अन्याय करणारा माणूस तुमच्या डोळ्यासमोर असा मोकाट असता तर? मला हा प्रश्न या चित्रपटात नानासोबत काम करणाऱ्या प्रत्येक कलाकाराला विचारावासा वाटत आहे. पैसे आणि यश हे आयुष्यभर पुरत नाही, तुम्ही काहीतरी लाज बाळगा’ असा टोला तिनं कलारांना ‘झूम टीव्ही’ला दिलेल्या प्रतिक्रियेतून लगावला आहे.

याच वाहिनीला पूर्वी दिलेल्या मुलाखतीत तिनं नाना पाटेकर यांच्यावर असभ्य वर्तणूक केल्याचा आरोप केला होता. तसेच अक्षय कुमार, रजनीकांत सारख्या कलाकारांनी नाना पाटेकर सारख्या कलाकारासोबत काम करणं थांबवलं पाहिजे तरच ‘metoo’ सारख्या मोहिमेला यश मिळेल असंही ती म्हटली होती.  तनुश्रींच्या आरोपानंतर अक्षयची पत्नी ट्विंकल खन्ना तिच्या पाठीशी उभी राहिली. एकीकडे हाऊस ४ च्या ग्रुप फोटोंमध्ये नानांसोबत अक्षय नसला तरी आपल्या प्रतिक्रियेतून तिनं अप्रत्यक्षरित्या अक्षयलाही टोला लगावला आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tanushree dutta lashes out at sajid nadiadwala akshay kumar and farah khan
First published on: 02-10-2018 at 14:21 IST