प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने माटुंगा येथील यशवंत नाट्य मंदिरात प्रथितयश फोटोग्राफर तेजस नेरुरकर याने ‘क्लिक’ केलेल्या छायाचित्रांचं, २०१७ चं एक नावीन्यपूर्ण कॅलेंडर प्रकाशित झाले असून,  हे वर्षं संपल्यानंतरही त्यात टिपलेल्या छबींमुळे हे कॅलेंडर संग्रहणीय ठरेल.‘क़्विन्स मेरी टेकनिकल इन्स्टीट्युट’ (QMTI)  संस्थेचे युद्धात जायबंदी झालेले जवान, ब्रिगेडियर त्यागी आणि सिनेसृष्टीतले कलाकार उमेश कामत, प्रिया बापट, सिद्धार्थ जाधव व उर्मिला कोठारे यांच्या हस्ते या दिनदर्शिकेचं अनावरण झाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रसिद्ध कल्पक फोटोग्राफर स्व. गौतम राजाध्यक्ष यांचा शिष्य तेजस नेरुरकर याच्या ‘थर्ड आय’ ने टिपलेली छायाचित्रे म्हणजे छायाचित्रकलेचे अप्रतिम नमुने ठरत आले आहेत. क्रिकेट आणि नंतर अॅनिमेशन फिल्ड मधून फोटोग्राफी फिल्डमध्ये आल्यावरअल्पावधीतच तेजसने आपल्या कल्पकतेच्या जोरावर फोटोग्राफीच्या मोठमोठ्या प्रोजेक्ट्सवर काम केलं आहे. हे करत असतानाच, सप्टेंबर २०१६ मध्ये उरी येथे जेव्हा दहशतवादी हल्ला झाला आणि त्यात आपले जवळजवळ १८ जवान शहीद झाले तेव्हा मनस्वी फोटोग्राफर तेजस आतून खूप हेलावला आणि त्या शहीद जवानांना मानवंदना म्हणून ह्या कॅलेंडरची निर्मिती झाली. जे सैनिक ३६५ दिवस अहोरात्र आपले रक्षण करतात त्यांची आठवण वर्षभर आपल्या नजरेसमोर या कॅलेंडरच्या माध्यमातून आपल्या सतत समोर राहील, या विचाराने भारावलेल्या तेजसने हे नावीन्यपूर्ण कॅलेंडर तयार केले आहे. या कॅलेंडरमधून युद्धभूमीवरचे आणि सिनेसृष्टीतील हिरो आपल्याला भेटत राहतील आणि गंमत म्हणजे सिनेसृष्टीतील हे कलाकार आपल्याला भेटतील तेही भारतीय जवानांच्या कडक गणवेशात !
पुण्यातील QMTI या संस्थेला १०० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने तेजसने हे कॅलेंडर या संस्थेला समर्पित केले आहे. युद्धात किंवा देशाची सेवा करता करता दुर्दैवीरित्या जायबंदी झालेल्या सैनिकांसाठी व त्यांचे पुनर्वसन करून त्यांना स्वबळावर समाजात स्थान मिळवून देण्याचे उदात्त कार्य QMTI संस्था गेली शंभर वर्षे करत आली आहे. या संपूर्ण उपक्रमात भारतीय सेनेतील मेजर जनरल प्रिथि सिंग यांचे सहकार्य अतिशय महत्त्वपूर्ण ठरले आहे.

या उदात्त कार्यासाठी मराठी सिनेसृष्टीतील अनेक तारे-तारकांनी क्षणाचाही विलंब न लावता तात्काळ फोटो शूटसाठी आपला वेळ दिला. उमेश कामत, प्रिया बापट, उर्मिला कोठारे, आदिनाथ कोठारे, सई ताम्हणकर, सुबोध भावे, पूजा सावंत, वैभव तत्ववादी, जितेंद्र जोशी, श्रिया पिळगावकर, नेहा पेंडसे, सिद्धार्थ जाधव हे सगळे सैनिकांच्या प्रेमापोटी आपला वेळ काढून शूटसाठी आले होते. त्यांच्या ह्या अनमोल सहकार्यामुळे ही कलाकृती उभी राहू शकली. शिवाय,  या संपूर्ण उपक्रमाविषयी महेश मांजरेकर आणि सोनाली कुलकर्णी ह्या दिग्गज कलाकारांचे अत्यंत मार्मिक असे निवेदन या कॅलेंडरमध्ये असून संपूर्ण कॅलेंडरच संग्रही ठेवण्यासारखं आहे. तसेच QMTI संस्थेसाठी जेष्ठ अभिनेते विक्रम गोखले अनेक वर्षे सेवा करीत असून त्यांचीही या उपक्रमासाठी मोलाची मदत झाली आहे. या व्यतिरिक्त, उपक्रमाच्या मदत निधीसाठी डॉक्टर अंबरीश दरक, सामाजिक मदतीसाठी क्षिप्रा यादव, लिड मिडियाचे विनोद सातव, दर्शन मुसळे आणि सिनेमॅटोग्राफर महेश लिमये यांची मदत उल्लेखनीय ठरली आहे. गायिका सायली पंकज, अभिनेत्री पूर्वी भावे, प्रसाद कांबळी, निलेश कुंजीर, वैभव शेटकर, जुईली नारकर, सुजित जगताप यांनी सुद्धा कार्यक्रमात आपापला बहुमूल्य वाटा उचलला होता. या कॅलेंडरच्या प्रकाशन सोहळ्यानंतर तेजसच्या या अभिनव कल्पनेला आणि कलेला संपूर्ण समाजाकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tejas nerurkar launch his calender with qmti
First published on: 27-01-2017 at 08:11 IST