गेल्या काही महिन्यांत प्रसाद ओक, अश्विनी कासार, माधुरी पवार अशा अनेक मराठी कलाकारांनी नवीन घर खरेदी करत आपलं स्वप्न पूर्ण केलं. या यादीत आणखी एका अभिनेत्रीचं नाव जोडलं गेलं आहे. ती म्हणजे अश्विनी महांगडे! अभिनेत्रीने यासंदर्भात नुकतीच एक पोस्ट शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.

‘स्वराज्यरक्षक संभाजी’, ‘आई कुठे काय करते’ या मालिकांमुळे अश्विनी घराघरांत लोकप्रिय झाली. तिने नुकत्याच शेअर केलेल्या सोशल मीडिया पोस्टमुळे सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. “प्रचंड स्वप्न पहा आणि ती पूर्ण करण्यासाठी मेहनत करा. मग काय…स्वप्नं पूर्ण होतातच. आज एक स्वप्न पूर्ण झालं.” असं कॅप्शन देत अश्विनीने स्वत:चा एक फोटो शेअर केला. यावर अभिनेत्रीने तिची जवळची मैत्रीण माधुरी आणि होणारा नवरा नील यांना टॅग करत कृतज्ञता व्यक्त केली आहे.

हेही वाचा : “एखाद्या स्त्रीच्या चारित्र्यावर…”, प्रसिद्ध मराठी अभिनेत्री ‘त्या’ घटनेमुळे अंकिता लोखंडेवर संतापली! मनारा चोप्राबद्दल म्हणाली…

हेही वाचा : ‘अ‍ॅनिमल’च्या यशानंतर उपेंद्र लिमये पुन्हा गाजवणार बॉलीवूड! ‘या’ चित्रपटात साकारणार महत्त्वाची भूमिका, जाणून घ्या…

अश्विनी महांगडेची जवळची मैत्रीण माधुरी पोळने अभिनेत्रीच्या नव्या घराची पहिली झलक इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केली आहे. या फोटोमध्ये अभिनेत्रीच्या नव्या घराचा व्ह्यू आणि तिच्या हातात घराची किल्ली पाहायला मिळत आहेत. अश्विनीने नवीन घर कुठे घेतलं याची माहिती अद्याप चाहत्यांना दिलेली नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
ashwini mahangade
अश्विनी महांगडे

दरम्यान, सध्या अश्विनीचे चाहते तिच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत. याशिवाय तिच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर अश्विनी सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते’मध्ये अनघा हे पात्र साकारत आहे. याशिवाय लवकरच ती मोठ्या पडद्यावर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची भूमिका साकारणार आहे.