मराठी अभिनेत्री अश्विनी महांगडे नेहमीच विविध कारणांमुळे चर्चेत असते. गेले काही वर्ष ती ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत अनघा हे पात्र साकारत आहे. तिच्या आयुष्यात घडणाऱ्या चांगल्या-वाईट अशा अनेक गोष्टी ती मनमोकळेपणाने सोशल मीडियावर शेअर करते. सध्या कुटुंबातील एका जवळच्या व्यक्तीच्या निधनाने संपूर्ण महांगडे कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे. इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत अश्विनीने आजीच्या निधनाबद्दल सांगितलं.

हेही वाचा : डॉन ३’मध्ये ‘जंगली बिल्ली’ म्हणून पुन्हा झळकणार प्रियांका चोप्रा; लवकरच होणार चित्रीकरणाला सुरुवात

अश्विनी महांगडेचं तिच्या आजीबरोबर अत्यंत जवळचं नातं होतं. अभिनेत्री म्हणाली, “आजी…फक्त प्रेमाचा साठा…पण भारी शिस्तीची… सगळ्यांना एकत्र बांधून ठेवणारी. एक काळ असा होता जेव्हा प्रचंड हाल सोसले पण कल्पतरूसारखी खंबीर उभी राहिली. माझे आणि बाबांचे (निलेश जगदाळे)किती कौतुक… पाहुणे म्हणायची ती बाबांना कारण जावयाचे नाव घ्यायचे नसते. आम्हा सगळ्यांची चिंता फक्त तिलाच.”

हेही वाचा : मुंबईच्या वाहतूक कोंडीला कंटाळली रिंकू राजगुरु, फोटो पोस्ट करत म्हणाली…

अश्विनी पुढे लिहिते, “विजय सावंत मशाल दौडला आला तर दहा वेळा मला फोन केला त्याची काळजी घे, तुम्ही नीट या….रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठानच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त सगळ्यांसाठी जेवणाची सोय नानांनी केली ती आजीच्या घरी. आजी, मामा, मामी, विजय, अक्षय सगळेच कामाला लागले. एखादी जबाबदारी पार पाडताना सगळ्यांना अगदी प्रेम द्यायची. तिचे प्रेम, तिची माया, घरात शिरल्या शिरल्या तिने घेतलेली पप्पी सगळेच आता परत अनुभवता नाही येणार… माझी आजी”

हेही वाचा : “तो ‘फू बाई फू’मध्ये गेल्याने खरा वाद…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या दिग्दर्शकांचे विधान; म्हणाले, “त्याचं कारण…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, अश्विनी महांगडेच्या अनेक चाहत्यांनी तिच्या दु:खात सहभागी होती आजीला भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. तसेच अभिनेत्रीचा होणारा नवरा निलेश जगदाळेने देखील या पोस्टवर कमेंट करत दु:ख व्यक्त केलं आहे.