‘आई कुठे काय करते’ ही मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय मालिका. गेल्या कित्येक वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. या मालिकेतील कलाकारांनी निभावलेलं प्रत्येक पात्र घराघरात पोहोचलं आहे. काही महिन्यांपूर्वी मालिकेत आरोहीची एन्ट्री झाली होती. याच आरोही म्हणजे अभिनेत्री कौमुदी वलोकरने चाहत्यांना वर्षा अखेरीस सुखद धक्का दिला आहे. कौमुदीचा ३१ डिसेंबरला थाटामाटात साखरपुडा पार पडला आहे. याचे फोटो शेअर करून तिने चाहत्यांबरोबर ही आनंदाची बातमी शेअर केली आहे.

अभिनेत्री कौमुदी वलोकरने दोन दिवसांपूर्वी एक पोस्ट शेअर केली होती. ज्यामध्ये होणाऱ्या नवऱ्याबरोबर फोटो शेअर करून लिहिल होतं, “उद्या आपल्या आयुष्याचे पोस्टर उघड होत आहे.” त्यानंतर काल कौमुदीने थेट साखरपुड्याचे फोटो शेअर करून चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. “या वर्षाच्या शेवटी आम्ही आमचा नवा अध्याय सुरू करत आहोत,” असं लिहित अभिनेत्रीने साखरपुड्याचा फोटो शेअर केला. कौमुदीचा आकाश चौकसेबरोबर थाटामाटात साखरपुडा पार पडला आहे. याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आले आहेत.

हेही वाचा – “फक्त कामासाठी आपली मराठी…”, ‘तारक मेहता…’ मधील भिडेंच्या हिंदी व्हिडीओवर चाहत्याची प्रतिक्रिया, अभिनेते म्हणाले…

कौमुदीच्या साखरपुड्याच्या पोस्टवर कलाकार मंडळीसह तिचे चाहते तिला नव्या प्रवासासाठी शुभेच्छा देत आहेत. अभिनेता अभिषेक देशमुख, अश्विनी महांगडे, कृतिका देव, अक्षया गुरव, नेहा शितोळे अशा अनेक कलाकार मंडळींनी कौमुदी आणि आकाशला शुभेच्छा दिल्या आहेत. माहितीनुसार, कौमुदीचा होणारा नवरा पीएचडी धारक आहे. तो शिक्षणसाठी कॅलिफोर्नियाला गेला होता.

हेही वाचा – Video: लग्नाच्या ५ दिवसाआधी अरबाज खानने पत्नी शुराला फिल्मी स्टाइलमध्ये केलं होतं प्रपोज, व्हिडीओ व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, कौमुदीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ती शाळेत असल्यामुळे अभिनय क्षेत्रात काम करत आहे. ‘शाळा’ चित्रपटाच्या माध्यमातून ती मोठ्या पडद्यावर झळकली होती. त्यानंतर कौमुदी ‘शटर’, ‘व्हायझेड’, ‘तुझ्या-माझ्यात’, ‘मी वसंतराव’ या चित्रपटात पाहायला मिळाली. तसेच ‘आई कुठे काय करते’ या मालिकेपूर्वी ती ‘देवाशप्पथ’ या मालिकेत झळकली होती.