‘आई कुठे काय करते’ या मालिकेमुळे अभिनेत्री राधा सागर घराघरांत लोकप्रिय झाली. या मालिकेत राधाने ‘अंकिता’ हे पात्र साकारलं होतं. दोन महिन्यांपूर्वीच राधाच्या घरी एका नव्या पाहुण्याचं आगमन झालं. बाळ झाल्याची गोड बातमी राधाने सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांबरोबर शेअर केली होती. आता अभिनेत्रीच्या बाळाचं थाटामाटात बारसं करण्यात आलं आहे. नामकरण सोहळ्यातील खास व्हिडीओ अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

राधाच्या लाडक्या लेकाच्या बारशाला जवळचे कुटंबीय, तिचे मित्र-मैत्रिणी व नातेवाईक उपस्थित होते. यावेळी अभिनेत्रीने पैठणीचा जांभळ्या रंगाचा सुंदर असा गाऊन ड्रेस परिधान केला होता. तिच्या गोड बाळाला सुद्धा अशाच प्रकारचा पारंपरिक ड्रेस घालण्यात आला होता. आई अन् लेकाच्या ट्विनिंग ड्रेसने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं.

हेही वाचा : “सेटवर स्वच्छतागृह नव्हती अशावेळी झाडामागे…”, दिया मिर्झाने सांगितला इंडस्ट्रीत आलेला अनुभव, म्हणाली…

राधा सागर आपल्या लेकाचं नाव काय ठेवणार याबद्दल तिच्या चाहत्यांच्या मनात प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती. लाडक्या लेकाला पाळण्यात ठेवल्यावर अभिनेत्री व तिच्या नवऱ्याने लेकाचं नाव सर्वांना सांगितलं. राधा सागरने तिच्या बाळाचं नाव ‘वीर’ असं ठेवलं आहे. ‘वीर’ या नावाचा अर्थ साहसी, योद्धा, सशक्त, धैर्यवान असा होतो.

हेही वाचा : “महिला पोलिसांनी गाडी अडवली अन्…”, अमोल कोल्हेंनी सांगितला धक्कादायक अनुभव; म्हणाले, “ट्रिपल इंजिन…”

View this post on Instagram

A post shared by Disha Kakade (@disha_k_makeover15)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, राधा सागरच्या लेकाच्या बारशातील अनेक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तिने लग्नाच्या १० वर्षानंतर आई होण्याचा निर्णय घेतला होता. या काळात तिने करिअरपासून ब्रेक घेतला. आता राधा बाळ वीरला अधिकाधिक वेळ देऊन त्याच्या संगोपनावर भर देणार आहे.