‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील गाजलेली मालिका ‘आई कुठे काय करते’ने अखेर प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. १९ नोव्हेंबरला या मालिकेच्या चित्रीकरणाचा शेवटचा दिवस पार पडला. त्यानंतर ३० नोव्हेंबरला ‘आई कुठे काय करते’ मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित झाला. त्यानिमित्ताने महाराष्ट्राची लाडकी अरुंधती म्हणजेच अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरने इन्स्टाग्रामवर लाइव्ह येऊन चाहत्यांशी संवाद साधला. यावेळी मधुराणीने आपल्या आगामी नव्या प्रोजेक्टविषयी भाष्य केलं.

गेल्या पाच वर्षांपासून मधुराणी प्रभुलकर अरुंधती म्हणून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. अरुंधती ही अनेक महिलांसाठी आयडॉल झाली आहे. त्यामुळे मालिका बंद होणार असल्याचं समजातच अनेकांनी नाराजी व्यक्त केली. भलेमोठे मेसेज कलाकार मंडळींना पाठवले. काल, ३० नोव्हेंबरला ‘आई कुठे काय करते’ मालिकेचा अंतिम भाग प्रसारित झाला. या अंतिम भागानंतर इन्स्टाग्रामवर लाइव्ह येऊन मधुराणीने चाहत्यांशी संवाद साधला. यावेळी तिने सर्व प्रेक्षकांचे आभार मानले. अरुंधती ही भूमिका तिच्या वाट्याला कशी आली? याविषयी सांगितलं. तसंच लवकरच नव्या प्रोजेक्टची घोषणा करणार असल्याचा खुलासा केला.

हेही वाचा – “हे थोडं अस्वस्थ करणारं…”, ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्याची भावुक पोस्ट, म्हणाला, “मधुराणीने साकारलेली आई…”

मधुराणी प्रभुलकर म्हणाली, “मी लाइव्ह आले फक्त तुम्हा सगळ्यांना धन्यवाद म्हणायला. अरुंधती म्हणून तुमचा आणि माझा बंध थांबला असेल तरी कुठल्यांना कुठल्या रुपात आपण भेटत राहणार आहोत. तर ही भेट आपली घडतच राहणार आहे. कारण अभिनय ही माझी आवड आहे ते केल्याशिवाय मी जगू शकत नाही.”

“पुन्हा नव्या भूमिकेत, पुन्हा नव्या कुठल्या प्रोजेक्टमधून १०० टक्के भेटणार आहे. तुम्ही अरुंधतीला मिस कराल, मी पण करेन. पण, मधुराणी मिस होवून देणार नाही. एवढं नक्की सांगते. जो काही पुढचा प्रोजेक्ट करेन त्याची लवकरच घोषणा करणार आहे. त्यालाही तुम्ही भरभरून प्रतिसाद, प्रेम, आशीर्वाद द्याल अशी मला खात्री आहे. तुमचा आणि माझा बंध आजन्मसाठी तयार झाला आहे. तो आपण तसाच ठेवणार आहोत…कधीही इन्स्टाग्रामवर संपर्क करा. भेटत राहू बोलत राहू,” असं मधुराणी प्रभुलकर म्हणाली.

हेही वाचा – ५ वर्षांचा प्रवास अखेर थांबला! ‘आई कुठे काय करते’ मालिका संपली, मधुराणीसह सगळेच कलाकार भावुक, वाचा पोस्ट

हेही वाचा – “दिग्दर्शकाने कट म्हटल्यानंतरही तो मला…”, बॉलीवूड अभिनेत्रीने सांगितला किसिंग सीनचा धक्कादायक अनुभव

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील अरुंधतीप्रमाणे इतर भूमिका देखील घराघरात पोहोचल्या. अनिरुद्ध, संजना, यश, ईशा, अभिषेक, अनिश, आप्पा, कांचन देशमुख, शंतून, विशाखा, आशिष या व्यक्तिरेखांनी सुद्धा प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं. तसंच मालिकेतील नवनवीन ट्विस्टने प्रेक्षकांचा चांगलाच खिळवून ठेवलं. त्यामुळे मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली होती. सर्वाधिक टीआरपी ‘आई कुठे काय करते’ मालिकेला मिळत होता. पण गेल्या काही महिन्यांपासून मालिकेतील सातत्याने बदलणारे ट्रॅक प्रेक्षकांना प्रचंड रंटाळवाणे वाटले. त्यामुळे प्रेक्षक ‘आई कुठे काय करते’ मालिका बंद करण्याची मागणी करत होते. याचवेळीस मालिकेची वेळ बदलण्यात आली. पण, ३० नोव्हेंबरला ‘आई कुठे काय करते’ मालिकेचा शेवट झाला.