अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरने ‘आई कुठे काय करते’ या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनात एक अढळ स्थान निर्माण केलं आहे. तिने साकारलेली अरुंधती ही महिलांसाठी एक आयडॉल झाली आहे. अशी ही मधुराणी तिच्या सहजसुंदर अभिनयामुळे जितकी चर्चेत असते तितकीच ती आता कवितेमुळे देखील चर्चेत असते. सोशल मीडियावर ती नेहमी कवितेचे व्हिडीओ शेअर करत असते. नुकतंच अभिनेत्रीने मुलीबरोबरचे काही फोटो शेअर करून एक पोस्ट लिहिली आहे; जी चांगलीच चर्चेत आली आहे.

हेही वाचा – इंद्रा-दीपू पुन्हा एकत्र! अजिंक्य राऊत व हृता दुर्गुळे आता मालिका नव्हे तर चित्रपटात झळकणार एकत्र

अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरने मुलीबरोबरचे सुंदर फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये मधुराणीची लेक स्वराली आणि तिची भाची इरा पाहायला मिळत आहे. हे फोटो शेअर करत मधुराणीने लिहिले आहे, “आत्ता आत्ता हाताचा पाळणा करून जोजवत होतो यांना…बघता बघता आपल्या उंचीला आल्यासुद्धा…किती झरझर मोठ्या होतात लेकी…माझी भाची इरा आणि स्वराली बरोबरची मैत्री मोमेंट..”

मधुराणीची ही पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे. तिच्या या पोस्टवर तिच्या चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. दरम्यान मधुराणीची लेक स्वराली ही फारच वेगळ्या शाळेत शिकते. जिथे कुठलाही बोर्ड नाही, अभ्यासक्रम नाही, इयत्ता नाही, वर्ग नाही, बेंचेस नाही, गणवेश नाही, अशा पद्धतीची स्वरालीची पुण्यात शाळा आहे. ‘गोकुळ’ असं या शाळेच नाव असून डॉ. ज्योत्स्ना पेठकर या शाळेच्या संचालिका आहेत, याबाबत काही महिन्यांपूर्वी मधुराणीने स्वतः सांगितलं होतं.

हेही वाचा – “त्यापेक्षा छोटा भीम बघितलेला बरा…”, ‘शिवा’ मालिकेच्या प्रोमोवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया, म्हणाले, “बंद कधी होणार?”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मधुराणी अनेकदा लेकीच्या शाळेत जात असते. तिथला मुलांबरोबर संवाद साधत असते. एकेदिवशी ती स्वरालीच्या शाळेतील मुलांना कविता शिकवायला गेली होती. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता.