सध्या टेलिव्हिजन विश्वामध्ये ‘बिग बॉस हिंदी’च्या नव्या पर्वाची चर्चा आहे. काही आठवड्यांपूर्वी सुरु झालेल्या कार्यक्रमाचा आनंद प्रेक्षक घेत आहेत. सगळेजण दिवाळीचा आनंद घेत असताना यावर्षीची ‘बिग बॉस’च्या घरातली दिवाळी कशी असेल याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. तसेच ‘बिग बॉस’च्या घरातील सर्वात लोकप्रिय स्पर्धक अब्दू रोजिक दिवाळीत काय धमाल करतो ते पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

आणखी वाचा : ‘अशी’ साजरी करतेय आलिया भट्ट लग्नानंतरची पहिली दिवाळी, पोस्टने वेधलं लक्ष

अलीकडेच, अब्दू रोजिकचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. कलर्स टीव्हीने त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर अब्दू रोजिकचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओत अब्दू रोजिक ‘बिग बॉस’च्या सोफ्यावर बसून सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देत आहेत. यासोबतच ‘बिग बॉस’ पाहण्याचे तो आवाहन करत आहे. या व्हिडिओमध्ये तो म्हणतो, “मैं हूं छोटा पॅकेट, बडा धमाका. देखते राहो ‘बिग बॉस’.”

अब्दूला थोडे थोडे हिंदी बोलता येते आणि भारतातील प्रेक्षकांना तो खास त्याच्या हटके आणि दिलखुलास शैलीत दिवाळीच्या शुभेच्छा देत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना कलर्स त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले, “अब्दू रोजिककडून तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.” एकीकडे चाहते त्या व्हिडीओवर कमेंट करत अब्दूला दिवाळीच्या शुभेच्छा देत आहेत, तर दुसरीकडे तो हिंदीत बोलल्याचा आनंद व्यक्त करत आहेत.

हेही वाचा : Bigg Boss 16: करण जोहरवर भेदभाव केल्याचा आरोप, सलमान खानकडे सूत्रसंचालन द्या; नेटकऱ्यांची मागणी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अब्दू रोजिक हा मुळ ताजिकिस्तानचा रहिवाशी असून तो अवघा १९ वर्षाचा आहे. अब्दू हा एक प्रसिद्ध गायक असून त्याची हिंदी गाणी इंस्टाग्राम व युट्युबवर व्हायरल होत असतात. अब्दू हा आपल्या गोंडस लुक मुळे व आवाजामुळे सोशल मीडिया सेन्सेशन ठरला आहे.