गणेशोत्सवानिमित्त सध्या सर्वत्र आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे. ढोल ताशांच्या गजरात घरोघरी मोठ्या उत्साहात बाप्पाचं आगमन झालेलं आहे. मराठी कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटींच्या घरी फळाफुलांची आरास करून बाप्पाची मनोभावे पूजा करण्यात आली. यंदा पर्यावरणपूरक मूर्ती, सामाजिक संदेश देणाऱ्या देखाव्यांनी लक्ष वेधून घेतलं. लोकप्रिय अभिनेत्री अभिज्ञा भावेच्या घरी यावर्षी अक्कलकोट येथील स्वामी समर्थ महाराजांचा भव्य मठ साकारण्यात आला आहे. अभिज्ञाने बाप्पाच्या स्वामीरुपी मूर्तीची मनोभावे पूजा केली. हा सुंदर देखावा साकारण्यामागचं खास कारण अभिनेत्रीने ‘राजश्री मराठी’शी संवाद साधताना सांगितलं.

हेही वाचा : ‘पिंकीचा विजय असो’ फेम अभिनेत्रीनं गुपचूप उरकला साखरपुडा; म्हणाली, “आयुष्यभरासाठी एका व्यक्तीला…”

अभिज्ञा स्वामी समर्थांच्या मठाचा सुंदर देखावा साकारण्याविषयी म्हणाली, “बाप्पाला आणि आमच्या घरी येणाऱ्या प्रत्येकाला प्रसन्न वाटलं पाहिजे हा आमचा एकमेव उद्देश असतो. यंदाची आमची स्वामीरुपी मूर्ती जेव्हा मी पहिल्यांदा पाहिली तेव्हा माझ्या डोळ्यात पाणी होतं. स्वामींची प्रचिती मला कायम आलेली आहे.”

हेही वाचा : “आता सुपरस्टार होणं कठीण झालंय”, नाना पाटेकर यांनी बॉलीवूडविषयी मांडलं स्पष्ट मत; म्हणाले, “बॉक्स ऑफिसच्या कमाईवरून…”

अभिज्ञा पुढे म्हणाली, “मेहुल आजारी असताना आम्हाला प्रत्येक माणूस भेटायचा तो स्वामीभक्त होता. तो आजारी असताना मला ज्या लोकांचे फोन आले ते सगळे स्वामीभक्त होते. स्वामींच्या कृपेने तुमचं सगळं छान होईल असा धीर मला सगळ्यांनी दिला. “अशक्य ही शक्य करतील स्वामी” ही आरती मी अचानक ऐकायला सुरुवात केली. प्रत्येकवेळी असा योगायोग होणं शक्य नाही. या संपूर्ण प्रक्रियेला मी योगायोग अजिबात म्हणणार नाही.”

हेही वाचा : बाप्पाची खास मूर्ती, मराठीतून आरती अन्…, देशमुखांच्या घरचा बाप्पा पाहिलात का? रितेश-जिनिलीयाच्या मुलांचं होतंय कौतुक

View this post on Instagram

A post shared by Meihul R Paii (@mehul_pai)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“मेहुलची सर्जरी झाल्यावर स्वामी समर्थांचा एक फोटो तुम्ही देवाऱ्यात आणून ठेवा असं सांगितलं होतं. आम्ही अनेक फोटो पाहिले पण, मनासारखा फोटो मिळत नव्हता. त्यानंतर आम्हाला एका सोनाराकडे स्वामींची मूर्ती प्रचंड आवडली…ती आम्ही घेतली. मूर्तीची स्थापना करायला लॉकडाऊनच्या काळात कोणीही गुरूजी भेटत नव्हते. तेव्हा या माणसाने ऑपरेशन झाल्यावर टाके घेऊन जवळपास दीड ते दोन तास बसून मूर्तीची प्रतिष्ठापना केली. एवढा मोठा योगायोग होणं शक्य नाही ही कुठली तरी शक्ती आहे जी सतत आमच्यामागे आहे. त्यामुळे स्वामींचं महत्त्व आमच्या आयुष्यात खूप जास्त आहे आणि शंभर टक्के हे महत्त्व कायम राहणार” असं अभिज्ञाने सांगितलं. दरम्यान, अभिज्ञा भावे सध्या ‘बातें कुछ अनकही सी’ या हिंदी मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारत आहे.