Actor Siddhant Issar married to co-star Surbhi Shukla : ‘महाभारत’ मध्ये दुर्योधनचे पात्र साकारणाऱ्या अभिनेत्याच्या घरात सध्या आनंदाचे वातावरण आहे. कारण त्यांच्या मुलाचं लग्न झालं आहे. २५ वर्षीय सिद्धांत लग्नबंधनात अडकला असून त्याच्या लग्नाला मोजक्याच पाहुण्यांनी व कलाकारांनी हजेरी लावली. सिद्धांतने लग्नातील काही फोटोही शेअर केले आहेत.

‘महाभारत’ या लोकप्रिय मालिकेत दुर्योधनाची भूमिका साकारणारा अभिनेता पुनीत इस्सरचा मुलगा सिद्धांत इस्सरने लग्नगाठ बांधली आहे. सिद्धांतने त्याची सहकलाकार सुरभी शुक्लाशी लग्न केलं आहे. ‘महाभारत’ मध्ये पितामहची भूमिका साकारणारे मुकेश खन्ना यांनी नवविवाहित जोडप्याला आशीर्वाद दिला.

सिद्धांत इस्सरने शनिवारी सोशल मीडियावर त्याच्या लग्नाचे फोटो शेअर केले. त्याने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आणि लिहिलं, ‘मिस्टर अँड मिसेस इस्सर’. सिद्धांत आणि सुरभीचा विवाह सोहळा एक खासगी समारंभ होता. या लग्नात कुटुंबातील सदस्य आणि काही जवळचे मित्र उपस्थित होते.

पाहा पोस्ट-

पुनीत इस्सर मुलाच्या लग्नात खूप आनंदी होता. त्याने सिद्धांत व सुरभीच्या लग्नात डान्स केला. बॉलीवूड अभिनेता सुनील शेट्टीने पुनीत इस्सरचा मुलगा सिद्धांत आणि सुरभीच्या लग्नाला हजेरी लावली आणि फोटोही काढले. सोशल मीडियावर सिद्धांतच्या लग्नाची चर्चा आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘शैतानी रस्में’ या शोच्या सेटवर सिद्धांत व सुरभी भेटले. मैत्री झाली आणि ते प्रेमात पडले. मालिकेत मुख्य भूमिकेत असलेल्या या दोघांची पडद्यावरची केमिस्ट्री प्रेक्षकांना फार आवडली होती. खऱ्या आयुष्यात प्रेमात पडलेल्या सिद्धांत व सुरभीने नंतर लग्न करायचा निर्णय घेतला. नोव्हेंबर २०२४ मध्ये त्यांचा साखरपुडा पार पडला आणि आता त्यांनी लग्न केलं. सिद्धांत इस्सर व सुरभी शुक्ला यांनी त्यांच्या लग्नाची बातमी शेअर केल्यावर चाहते त्यांचं अभिनंदन करत आहेत. या जोडप्यावर आयुष्यातील या नवीन प्रवासासाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.