Ram Kapoor buys New Lamborghini : अभिनेता राम कपूर हा त्याच्या वेगवेगळ्या चित्रपट आणि मालिकांमधील भूमिकांमुळे ओळखला जातो. सध्या राम कपूर आणि त्याची पत्नी गौतमी कपूर हे एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहेत.

राम कपूरने खरेदी केलेल्या लॅम्बोर्गिनीची किंमत किती?

आता या जोडप्याने नुकतीच ४.५७ कोटी रुपयांपेक्षा अधिक किंमतीची लॅम्बोर्गिनी उरुस एसई एसयूव्ही खरेदी केली आहे. ही कार लॅम्बोर्गिनी उरुस श्रेणीतील लेटेस्ट कार असून याचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत. राम कपूरने विकत घेतलेली ही लक्झरी कार भारतीय बाजारात २०२४ मध्ये दाखल झाली होती.

कारक्रेझी इंडिया या इंस्टाग्राम अकाउंटने राम कपूरने खरेदी केलेल्या नवीन कारचे काही फोटो शेअर केले आहेत. ही पोस्ट शेअर करताना राम कपूरला टॅग करत त्याचे अभिनंदन केले आहे. या फोटोंमध्ये राम कपूर त्याच्या पत्नीसह दिसत आहे. चाहत्यांनी अभिनेत्यावर शुभेच्छांचा वर्षाव केल्याचे कमेंटमध्ये पाहायला मिळत आहे.

राम कपूरच्या या लॅम्बोर्गिनी कारचा रंग Verde Gea (मॅट ऑलिव्ह ग्रीन) असल्याचे पाहायला मिळत आहे. तर कारची केबिन ‘बोल्ड ब्लॅक’ आणि ऑरेंज शेडची असल्याचे दिसून येत आहे.

कार इतकी महागडी का आहे? काय आहे खास?

लॅम्बॉर्गिनी उरुस एसई या गाडीत ४.०-लिटर, ट्विन-टर्बोचार्ज्ड व्ही८ इंजिन मिळते जे ६२० एचपी आणि ८०० एनएम पॉवर देते. तसेच या गाडीमध्ये प्लग-इन हायब्रिड सिस्टम देखील देण्यात आले आहे. जे २५.९ किलोवॅट प्रति तास लिथियम-आयन बॅटरी पॅकसह काम करते.

याबरोबरच याच्यात ८-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक गिअरबॉक्समध्ये हायब्रिड सिस्टममध्ये इलेक्ट्रिक मोटर वापरली जाते, ज्यामुळे एकूण ८०० एचपी आणि ९५० एनएम आउटपुट मिळतो. या लॉम्बॉर्गिनी मॉडेलमध्ये एलईडी हेडलाईट्स, नवीन एलईडी डीआरएल आणि अपग्रेड केलेला पुढचा भाग असून गाडीच्या मागील बाजूस अतिरिक्त नवीन बंपर देण्यात आले आहे.

राम कपूरचे कार कलेक्शन

राम कपूर हा त्याच्याकडे असलेल्या लक्झरी गाड्यांच्या कलेक्शनसाठी ओळखला जातो. त्याच्याकडे आधीच अनेक दुर्मिळ आणि महागड्या कार आहेत, ज्यामध्ये पोर्श ९११, पोर्श ९११ टर्बो एस, फरारी पोर्टोफिनो एम, रेंज रोव्हर ऑटोबायोग्राफी, मर्सिडिज -एएमजी जी ६३ यांचा समावेश आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, राम कपूरच्या आगामी प्रोजेक्टबद्दल सांगायचे झाल्यास तो येत्या काही दिवसात ‘मिस्ट्री’ असे असून हा शो २७ जून रोजी जीओहॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.