Rituraj Singh Death: लोकप्रिय अभिनेते ऋतुराज सिंह यांचं निधन झालं आहे. टीव्ही व चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणारे ऋतुराज सिंह यांची हृदय बंद पडल्यामुळे (कार्डिअॅक अरेस्ट) प्राणज्योत मालवली. ते ५९ वर्षांचे होते. सोमवारी रात्री त्यांचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या निधनाने मनोरंजसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

ऋतुराज यांनी ‘अपनी बात’, ‘ज्योती’, ‘हिटलर दीदी’, ‘शपथ’, ‘वॉरियर हाय’, ‘आहट’, ‘अदालत’, ‘दिया और बाती’ अशा अनेक शोमध्ये काम केलं होतं. ते रुपाली गांगुलीसह लोकप्रिय हिंदी मालिका ‘अनुपमा’मध्येदेखील झळकले होते. याशिवाय त्यांनी ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’, ‘सत्यमेव जयते २’, ‘थुनिवू’, ‘जर्सी’, ‘हम तूम और घोस्ट’ या चित्रपटात काम केलं होतं. जानेवारीत प्रदर्शित झालेल्या रोहित शेट्टीच्या ‘इंडियन पोलीस फोर्स’मध्ये ऋतुराज यांनी रफीक ही भूमिका साकारली होती. अभिनेते अमित बहल यांनी ऋतुराज यांच्या निधनाच्या वृत्ताची पुष्टी केली आहे.

ऋतुराज सिंह यांचे निधन हृदय बंद पडून झाले आहे. ते काही काळापासून स्वादुपिंडाशी संबंधित समस्यांनी त्रस्त होते. त्यांच्या आकस्मिक निधनाने त्यांच्या कुटुंबालाच नव्हे तर त्यांच्या चाहत्यांनाही मोठा धक्का बसला आहे. ऋतुराज यांचे मित्र व अभिनेते अमित बहल यांनी या वृत्ताला दुजोरा देत दु:ख व्यक्त केले आहे.

“मी नितीश भारद्वाज यांची…”, ‘महाभारत’ फेम ‘कृष्णा’च्या सर्व आरोपांवर IAS पत्नीची प्रतिक्रिया; म्हणाल्या, “माझ्या जुळ्या मुली…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“होय, हृदय बंद पडल्यामुळे ऋतुराज सिंह यांचा मृत्यू झाला आहे. स्वादुपिंडाच्या आजाराच्या उपचारासाठी त्यांना काही काळापूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. घरी परतत असताना हृदय बंड पडल्याने त्यांचे निधन झाले,” असं अमित बहल म्हणाले.