सुव्रत जोशी हा मराठी मनोरंजन सृष्टीतील एक बहुआयामी अभिनेता म्हणून ओळखलं जातो. नाटक, मालिका, चित्रपट, वेब सिरीज अशा विविध माध्यमातून तो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. तर नुकतीच त्याची महत्त्वपूर्ण भूमिका असलेली ‘ताली’ हे वेब सिरीज प्रदर्शित झाली. या सिरीजमधील त्याच्या कामाचं खूप कौतुक होत आहे. तर आता एका मुलाखतीमध्ये त्याने त्याच्या आयुष्यातील अनेक गुपितं उघड केली आहेत. सर्वात आधी तो कोणाला डेट करत होता हे सांगत त्याने पहिल्या प्रपोजचा किस्सा शेअर केला आहे.

सुव्रत जोशी त्याच्या दिलखुलासपणामुळे नेहमी चर्चेत असतो. सोशल मीडियावरून किंवा अनेक मुलाखतींमध्ये तो त्याच्या आयुष्यातील अनेक गोष्टी शेअर करत असतो. तर आता ‘लोकमत फिल्मी’ला दिलेल्या मुलाखतीत त्याने आयुष्यात पहिल्यांदा कोणत्या मुलीला प्रपोज केलं याचा खुलासा केला आहे.

आणखी वाचा : सुश्मिता सेनची प्रमुख भूमिका, तर जावई सुव्रत तृतीयपंथीयाच्या भूमिकेत…; ‘ताली’ पाहून शुभांगी गोखले म्हणाल्या…

तो म्हणाला, “मी खूप उशिरा मुलींना प्रपोज करायला सुरुवात केलं. माझी कॉलेजमध्ये एक मैत्रीण होती. आम्ही काही वर्षं एकमेकांना डेट केलं. पण आमचं नातं लग्नापर्यंत पोहोचू शकलं नाही. आताही ती माझी चांगली मैत्रीण आहे. पण मी तिला घाबरत घाबरत प्रपोज केलं होतं. ती तिच्या घरामध्ये असलेल्या कॉटच्या पलीकडे बसली होती आणि मी त्यांच्या घराच्या दरवाजाच्या जवळ जो चप्पल स्टॅन्ड होता त्यावर एक काळ्या रंगाचा कडप्पा होता त्यावर बसलो होतो. तेव्हा तिला खूप दुरून मी “मला तू आवडतेस” असं सांगितलं होतं आणि तिथून निघालो होतो.” सुव्रतचा हा मजेशीर किस्सा त्याच्या चाहतांना खूप आवडला आहे.

हेही वाचा : “आता वेळ आलीए पूर्णविराम देण्याची…” सुव्रत जोशीच्या ‘त्या’ पोस्टमुळे चाहते निराश

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, सुव्रत जोशी आणि सखी गोखले यांनी २०१९ मध्ये लग्न केलं. ‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेमुळे त्या दोघांची ओळख झाली होती. तर त्यानंतर काही वर्षं एकमेकांना डेट केल्यावर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.