एकदिवसीय विश्वचषक २०२३ चा काल भारत विरूद्ध पाकिस्तान असा सामना रंगला. या सामन्यात भारताने सात गडी राखून पाकिस्तानचा पराभव केला. सर्वांच्याच मनात या सामन्याबद्दल प्रचंड उत्सुकता होती. अनेक सेलिब्रिटींनी हा सामना लाईव्ह पाहण्यासाठी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये हजेरी लावली. मराठमोळी अभिनेत्री अदिती द्रविडही हा सामना पाहण्यासाठी अहमदाबादला गेली होती. तो अनुभव आता तिने शेअर केला आहे.

अदिती क्रिकेटप्रेमी आहे. काल ती आपल्या भारत संघाला पाठिंबा देण्यासाठी अहमदाबादला भारत विरुद्ध पाकिस्तान मॅच पाहायला गेली होती. मॅच बघायला जातानाचा एक स्टेटस तिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला होता. भारत संघाची जर्सी घालून ती मॅच बघायला गेली होती.

आणखी वाचा : “सुंदरा मनामध्ये भरली मालिकेसाठी किती मानधन मिळालं?” अभिनेत्रीने सांगूनच टाकलं, म्हणाली…

तर काल सामन्यादरम्यानचा एक व्हिडिओ तिने आज सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. हा सामना प्रत्यक्ष बघणं तिने किती एन्जॉय केलं हे त्या पोस्ट मधून स्पष्ट होत आहेत. तिने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये अदिती भारत संघातील खेळाडूंना चिअरअप करताना, षटकार, चौकार मारल्यावर, सामना जिंकल्यावर जल्लोष करताना दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करत तिने लिहिलं, “व्हॉट अ डे!! भारत विरुद्ध पाकिस्तान, वर्ल्डकप २०२३ लाइव्ह. इंडिया इंडिया….!”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचा : “तुझी जात कोणती?” नेटकऱ्याच्या प्रश्नाला अदिती द्रविडने दिलं जशास तसं उत्तर, म्हणाली…

तर आता तिचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर कमेंट करत तिचे चाहते, तिचे मित्रमंडळी तिच्या या अंदाजाचं कौतुक करत आहेत.