ऐश्वर्या नारकर हे मराठी मनोरंजन सृष्टीतील एक मोठं नाव आहे. गेली अनेक वर्षं त्या विविध मालिका, नाटकं, चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. त्यांच्या कामाबरोबरच त्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असतात. त्यांचे फोटो नेहमीच सर्वांचं लक्ष वेधून घेत असतात. त्यांच्या कपाळावर एक खूण आहे आणि ही खूण कसली याचं उत्तर आता त्यांनी दिलं आहे.

ऐश्वर्या नारकर नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय राहून त्यांचे विविध फोटो शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असतात. नुकताच त्यांनी इन्स्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधला. काल त्यांनी इन्स्टाग्रामवर ‘आस्क मी एनीथिंग’ हे सेशन घेतलं. यावेळी अनेक चाहत्यांच्या विविध प्रश्नांची त्यांनी उत्तर दिली. यावेळी त्यांनी त्यांच्या कपाळावर असलेल्या खूणेबद्दल खुलासा केला.

आणखी वाचा : “मी पहिल्यांदा शॉर्ट्स घातली आणि…” ऐश्वर्या नारकर यांनी रंगलेल्या चर्चंबाबत केलं भाष्य

या सेशनदरम्यान एका चाहत्याने त्यांना विचारलं, “मॅम तुम्हाला ती कपाळावरची खूण खूप छान दिसते. सॉरी पण ते काय झालं आहे?” चाहत्याच्या या प्रश्नाचं उत्तर देत ऐश्वर्या नारकर यांनी लिहिलं, “#birthmark.” ऐश्वर्या नारकर यांच्या कपाळावर ती जन्म खूण असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

हेही वाचा : Video: “आमची मतं वेगळी…”, ऐश्वर्या नारकरांनी व्यक्त केल्या पती अविनाश नारकरांबद्दलच्या भावना

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तर याबरोबरच त्यांनी त्यांचा फिटनेस फंडा, नाटकामध्ये पुन्हा कधी काम करणार, त्यांचं शिक्षण, त्यांचं वय अशा अनेक प्रश्नांची देखील उत्तर दिली आहेत.