‘बिग बॉस’च्या १७व्या पर्वाचे टॉप पाच स्पर्धेक सध्या पार्टी करताना दिसत आहेत. कोणी आपल्या कुटुंबासह पार्टी करत आहे, तर कोणी ‘बिग बॉस’च्या घरातील इतर सदस्यांबरोबर पार्टी करताना दिसत आहे. अशातच अभिनेत्री अंकिता लोखंडेचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये ती नावेद सोलबरोबर डान्स करताना पाहायला मिळत आहे.

नुकतीच अंकिता लोखंडेने ‘बिग बॉस’मधल्या काही सदस्यांबरोबर पार्टी केली. ज्यामध्ये नावेद सोल देखील होता. या पार्टीत अंकिताने नावेद सोलबरोबर ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटातील ‘तुम क्या मिले’ या गाण्यावर डान्स केला. यावेळी डान्स करत असलेल्या अंकिताला नावेद गालावर किस करताना दिसला. याचा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर ‘विरल भयानी’च्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी अंकिताला ट्रोल केलं आहे.

हेही वाचा – Video: ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत मोठा ट्विस्ट, लवकरच सागरच्या मोठ्या मुलाची होणार एन्ट्री अन् मग…

एका नेटकऱ्याने लिहिलं आहे, “नवऱ्याने केलं तर इनसिक्योर आणि स्वतः केलं तर ओके.” तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं आहे, “हेच विकीने असं केलं असतं तर अजून इनसिक्योरिटी वाढली असते.” तसेच तिसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं आहे, “बाहेर येताच ओरीचा आत्मा अंकितात आला वाटत.” चौथ्या नेटकऱ्याने लिहिलं आहे, “सासूने बघितलं तर काय होईल?”

हेही वाचा – अशोक सराफांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर होताच ज्येष्ठ अभिनेत्रीची खास पोस्ट, म्हणाल्या, “माझ्या अपघातानंतर…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘बिग बॉस’च्या १७व्या पर्वाच्या विजेतेपदासाठी अंकिता लोखंडे प्रबळ दावेदार होती. त्यामुळे अंकिता टॉप-२ मध्ये असेलच किंवा विजेती होईल, अशी तिच्या चाहत्यांना अपेक्षा होती. पण तिला चौथ्या स्थानावरच समाधान मानावं लागलं.