अंकिता लोखंडे मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. ‘पवित्र रिश्ता’ मालिकेतून प्रसिद्धीझोतात आलेल्या अंकिताने अभिनयाच्या जोरावर कलाविश्वात स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं. अंकिता सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. कामाव्यतिरिक्त वैयक्तिक आयुष्याबाबतही अनेकदा अंकिता पोस्ट शेअर करताना दिसते.

पती विकी जैनसह अंकिता सध्या सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. अंकिताने नुकताच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे. एका हॉटेलमधील रुमचा हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओमध्ये अंकिताने पती विकीबरोबर सुट्टीसाठी गेलेल्या हॉटेलमधील आलिशान रुमची झलक दाखवली आहे. अंकिताने शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहे. पण या व्हिडीओमुळे नेटकऱ्यांनी अंकिताला ट्रोल केलं आहे.

हेही वाचा>> शेअर मार्केटमधील गुंतवणुकीवर SEBI ने बंदी घातल्यानंतर अर्शद वारसीचं ट्वीट, अभिनेता म्हणाला “कष्टाने कमावलेला पैसा…”

हेही वाचा>> Video: राधिका मर्चंटचा पार्टीदरम्यानचा व्हिडीओ व्हायरल, अंबानींच्या होणाऱ्या सुनेच्या साधेपणाने वेधलं लक्ष

अंकिताने इन्स्टाग्रामवरुन शेअर केलेल्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत. “नवऱ्याच्या पैशावर उड्या मारते”, अशी कमेंट एकाने केली आहे. तर दुसऱ्याने “पैसेवाल्याशी लग्न करण्याचा हाच फायदा आहे” असं कमेंटमध्ये म्हटलं आहे. काहींनी सुशांत सिंह राजपूतवरुनही कमेंट केल्या आहेत. “सुशांतमध्ये काय कमी होतं? कदाचित जास्त पैसेवाला नसेल” असं एका नेटकऱ्याने कमेंटमध्ये म्हटलं आहे. “सुशांत चांगला माणूस होता” असंही एकाने म्हटलं आहे.

हेही वाचा>> आजारी आईला भेटायला गेलेला नवाजुद्दीन सिद्दीकी, सख्ख्या भावाने बाहेरचा रस्ता दाखवला अन्…; व्हिडीओ व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

छोट्या पडद्यावरुन अभिनयातील कारकिर्दीला सुरुवात केलेल्या अंकिताने चित्रपटांतही काम केलं आहे. कंगना रणौतच्या ‘मणिकर्णिका’ चित्रपटातही ती झळकली होती. अंकिताचं नाव दिवगंत अभिनेता सुशांत सिंह राजपूतबरोबर जोडलं गेलं होतं. परंतु, काही वेळ रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर ते एकमेकांपासून वेगळे झाले. अंकिताने १४ डिसेंबर २०२१ रोजी उद्योजक विकी जैनशी लग्नगाठ बांधून नव्या आयुष्याला सुरुवात केली.