लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री व डान्सर मोहेना कुमारी ‘ये रिश्ता क्या कहलाता है’मध्ये कार्तिकच्या बहिणीची भूमिका साकारून लोकप्रिय झाली. आपल्या करिअरची सुरुवात रिअॅलिटी शोपासून करणाऱ्या मोहेनाने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. मोहनाने आता एक आनंदाची बातमी दिली आहे. ती दुसऱ्यांदा आई झाली आहे. अभिनेत्रीने एप्रिल महिन्यात मुलीला जन्म दिला. त्यानंतर आता पहिल्यांदाच तिने व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना गुड न्यूज दिली.

मोहेनाने पती, मुलगा, ती व तिची लाडकी लेक असा सर्वांचा एक छान व्हिडीओ शेअर केला आहे. तिने मुलीचं नावही जाहीर केलं आहे. मोहनाने मुलीचं नाव खूप हटके ठेवलं आहे. मोहेनाच्या मुलाचं नाव अयांश आहे. दोन वर्षांचा अयांश आता मोठा भाऊ झाला आहे, असंही तिने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. मोहेनाने पती सुयश रावतला टॅग करत हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून चाहते तिचं अभिनंदन करत आहेत.

करीना-तब्बू-क्रितीची जुगलबंदी OTT वर पाहता येणार; या वीकेंडला प्रदर्शित होणाऱ्या कलाकृती कोणत्या? वाचा नावं

“आधी दोन ते तीन, आता तीन ते चार. अयांशला आता एक लहान बहीण आहे. थोडा उशीर झाला, पण आम्ही आमच्या आयुष्यात लहानग्या गौरिताचं स्वागत करत आहोत,” असं कॅप्शन देत मोहेनाने व्हिडीओ पोस्ट केला आहे. मोहेनाने लाडक्या लेकीचं नाव गौरिता ठेवलं आहे. या व्हिडीओत मोहेना, तिचा पती सुयश, त्यांचा लेक अयांश व चिमुकली गौरिता या सर्वांनी एकमेकांच्या हातावर हात ठेवले, यात सर्वात शेवटी गौरिताचा दिसत आहे.

पती फोटोग्राफर तर सासरे मंत्री, स्वत: राजकुमारी असलेली अभिनेत्री अभिनय सोडून रमली संसारात, पाहा Photos

मोहेनाने मार्च महिन्यात एका व्हिडीओमध्ये बेबी बंप फ्लाँट करत ती आई होणार असल्याची बातमी दिली होती. त्यानंतर एप्रिल महिन्यात तिने गौरिताला जन्म दिला. मोहेनाने पोस्ट करून लेकीच्या जन्माची माहिती दिली नव्हती, पण तिच्या जवळच्या लोकांनी तिचं अभिनंदन करणाऱ्या पोस्ट केल्या होत्या ज्या तिने शेअर केल्या होत्या. त्यानंतर आता तिने पहिली पोस्ट करून लाडक्या लेकीचं स्वागत केलं व तिचं नाव जाहीर केलं.

तमन्ना भाटियाच्या चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर जलवा, १७ दिवसांपासून करतोय तुफान कमाई; तुम्ही पाहिला का?

मोहेनाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झाल्यास तिच्या पतीचं नाव सुयश रावत आहे. या दोघांनी पाच वर्षांपूर्वी २०१९ मध्ये लग्न केलं. तिने २०२२ मध्ये तिच्या पहिल्या मुलाला जन्म दिला, त्याचं नाव अयांश आहे. मोहेना ही मध्य प्रदेशमधील रीवाची राजकुमारी आहे. मोहेनाच्या सासरची मंडळी राजकारणात सक्रिय आहे. तिचे सासरे सतपाल महाराज उत्तराखंडचे पर्यटन मंत्री आहेत. तर तिचे पती सुयश हे फोटोग्राफर व बिझनेसमन आहेत.

View this post on Instagram

A post shared by Mohena Kumari Singh (@mohenakumari)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मोहेनाने ‘दिल दोस्ती डान्स’, ‘ये है आशिकी’, ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या शोमध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. पण लग्नानंतर ती संसारात रमली व अभिनयक्षेत्रापासून दूर झाली. सध्या ती तिच्या कुटुंबाबरोबर वेळ घालवत आहे.