निवेदिता सराफ या गेली अनेक वर्षं त्यांच्या सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांना भारावून टाकत आल्या आहेत. गेली अनेक दशकं त्या विविध नाटकं, मालिका, चित्रपटांतून प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. त्यांचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. तर आता त्यांनी एका पोस्टमधून त्यांना नुकताच आलेला एक वाईट अनुभव शेअर केला आहे.

निवेदिता सराफ यांच्या आयुष्यात काय सुरू आहे हे जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते नेहमीच उत्सुक असतात. तर निवेदिता सराफही सोशल मीडियावर सक्रिय राहून चाहत्यांना त्यांच्या आयुष्याबद्दलचे अपडेट्स देत असतात. आता त्यांनी केलेली एक पोस्ट खूप चर्चेत आली आहे. नुकत्याच त्या मुंबईतील इन्फिनिटी २ मॉलमध्ये गेल्या असताना त्यांना एका ब्रँडेड स्टोअरमध्ये योग्य वागणूक मिळाली नसल्याचा अनुभव त्यांनी सांगितला आहे.

आणखी वाचा : “माय डार्लिंग, तू माझ्यासाठी…,” निवेदिता सराफ यांनी अशोक मामांसाठी केलेली ‘ती’ पोस्ट चर्चेत

त्यांनी एक पोस्ट शेअर करत लिहिलं, “मी मालाडच्या इन्फिनिटी २ मॉलमधील ‘मॅक्स’मध्ये गेले होते. तिथे मला खूप वाईट अनुभव आला. तेथील कर्मचाऱ्यांना तुम्ही काय खरेदी करत आहात किंवा नाही याच्याशी काहीही फरक पडत नव्हता. ते कोणतीही मदत करत नव्हते. एक मुलगी आली आणि तिने दुसऱ्या कर्मचाऱ्याला सांगितलं की तिला वेळ नाहीये आणि निघून गेली. तेव्हा तेथील एका व्यक्तीने मला ओळखलं तेव्हा त्याने माझी माफी मागितली आणि मॅनेजरला बोलावलं.”

हेही वाचा : अशोक मामा व निवेदिता सराफ यांनी सायली संजीवला दिली खास भेट; खुलासा करत अभिनेत्री म्हणाली, “त्यांनी माझ्यासाठी…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढे त्या म्हणाल्या, “मी एक लोकप्रिय चेहरा आहे म्हणून मला चांगली वागणूक हवी होती असं नाही. पण एक ग्राहक म्हणून मला चांगली हवी होती. मी ते डिझर्व्ह करते. फक्त मीच नाही तर त्या स्टोअरमध्ये येणारा प्रत्येक ग्राहक ते डिझर्व्ह करतो.” तर आता त्यांची ही पोस्ट खूप वायरल होत असून यावर नेटकरी विविध प्रतिक्रिया देत आहेत.