मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत ऋतुजा बागवे हिचा समावेश होतो. नाटक, मालिका, चित्रपट अशा विविध माध्यमात काम करत ती प्रेक्षकांच्या भेटीस येत असते. आतापर्यंत तिने साकारलेल्या अनेक भूमिकांना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. तिच्या कामाबरोबरच ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते. तर आता तिने केलेल्या एका पोस्टने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.
ऋतुजा बागवेचा चाहतावर्ग मोठा आहे. तर ऋतुजाही सोशल मीडियावर सक्रिय राहून तिच्या आयुष्यात घडणाऱ्या घडामोडी चाहत्यांशी शेअर करत असते. काही दिवसांपूर्वीच तिने स्वतःच नवीन घर घेतलं. या घराच्या गृहप्रवेशाचा एक व्हिडिओ शेअर करत तिने ही बातमी चाहत्यांची शेअर केली होती. तर आता या घराच्या खिडकीतून कसा व्ह्यू दिसतो हे तिने दाखवलं आहे.
ऋतुजाचं हे नवीन घर मुंबईत आहे. तर सध्या या घराच्या इंटिरियरचं काम सुरू आहे. अनेकदा ऋतुजा या तिच्या नवीन घरी जात घराची पाहणी करत असते. नवीन घरी गेल्यावर ती तेथील काही फोटो आणि व्हिडीओही चाहत्यांची शेअर करते. तर नुकताच तिने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर या घराच्या खिडकीतून काढलेला एक व्हिडीओ शेअर केला. यामध्ये तिच्या खिडकीतून दिसणारा व्ह्यू दिसत आहे. ऋतुजाचं हे नवीन घर उंचावर आहे. तर तिथून आजूबाजूचा हिरवागार परिसर दिसतो. तिच्या बिल्डिंगच्या शेजारी कुठलीही वेगळी बिल्डिंग नसल्यामुळे तो संपूर्ण परिसर झाडांनी भरलेला आहे. तर त्याच्या पाठी डोंगरही आहे. त्या डोंगरावर जेव्हा धुकं येतं तेही ऋतुजाच्या घरातून स्पष्ट दिसतं.

हेही वाचा : “जेव्हा लोक विचारतात, वय झालंय लग्न कधी करणार? तेव्हा…” ऋतुजा बागवेची पोस्ट चर्चेत
तर काही दिवसांपूर्वीच ऋतुजाने तिच्या घराच्या नवीन नेमप्लेटची झलकही चाहत्यांना दाखवली. काळ्या रंगाच्या नेमप्लेटवर पांढऱ्या रंगाच्या सुंदर फुलांची नक्षी आहे. तर त्यावर ऋतुजाचं संपूर्ण नाव लिहिलं आहे. आता चाहते तिच्या या पोस्टवर कमेंट करत तिला या नवीन घरासाठी शुभेच्छा देत आहेत.