अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी चित्रपट, मालिका, नाटक अशा तिन्ही माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. आजवर त्यांनी अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे. सध्या झी मराठी वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत त्या खलनायिकेची भूमिका साकारत आहेत.

ऐश्वर्या नारकर समाजमाध्यमांवर कायम सक्रिय असतात. अनेकदा सेटवरच्या मेकअप रूममधली धम्माल-मस्ती, सहकलाकारांबरोबरचे डान्स व्हिडीओ त्या समाजमाध्यमावर शेअर करीत असतात. असाच एक व्हिडीओ त्यांनी नुकताच समाजमाध्यमांवर शेअर केला आहे.

हेही वाचा… ठरलं तर मग: सुभेदार कुटुंबासमोर प्रिया उघड करणार सायली-अर्जुनच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य? पाहा प्रोमो

सध्या ‘माझ्याशी नीट बोलायचं’ हे गाणं समाजमाध्यमावर तुफान व्हायरल होतंय. खरं तर ‘भाडीपा’चं हे गाणं दोन वर्षांपूर्वीच प्रदर्शित झालंय; पण आता ते व्हायरल होतंय. या गाण्यावर अनेक कलाकार आणि इन्फ्लुएन्सर्सनी रील्स केल्या आहेत. मिताली मयेकर, संदीप पाठक, तितीक्षा तावडे अशा अनेक मराठी कलाकारांनी हा ट्रेंड फॉलो केला आहे. प्रत्येक ट्रेंड फॉलो करणाऱ्या अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनीदेखील हा ट्रेंड फॉलो केला आहे.

ऐश्वर्या नारकर यांनी त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ‘हा व्हिडीओ सर्व ट्रोलर्ससाठी’, असं त्यांनी या व्हिडीओवर लिहिलंय.

हेही वाचा… VIDEO: ‘ठरलं तर मग’ मालिकेतील अर्जुन-सायली आणि चैतन्य-साक्षीने केला साखरपुड्यादिवशी मजेशीर डान्स; चाहते म्हणाले, “वेडे आहात तुम्ही”

ऐश्वर्या नारकर यांचा हा व्हिडीओ समाजमाध्यमावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. या व्हिडीओवर चाहत्यांच्या भरभरून प्रतिक्रिया आल्या आहेत. “हो! नीटच बोलणार तुमच्याशी” अशी कमेंट एका चाहत्याने केली. त्यात तुम्ही खूप गोड दिसताय. ‘तथ्य आणि मजा’, अशी कॅप्शन त्यांनी या व्हिडीओला दिली आहे.

हेही वाचा… ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’च्या प्रत्येक एपिसोडसाठी कपिल शर्मा घेतो ‘इतक्या’ कोटींचं मानधन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ऐश्वर्या नारकर यांच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर झी मराठी वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत ऐश्वर्या नारकर खलनायिकेची भूमिका साकारत आहेत. ही मालिका आता रंजक वळणावर येऊन पोहोचली आहे. या मालिकेत तितीक्षा तावडे नायिकेची भूमिका साकारत आहे; तर अजिंक्य ननावरे, श्वेता मेहेंदळे, राहुल मेहेंदळे, जयंत घाटे यांच्याही यात निर्णायक भूमिका आहेत.