काही दिवसांपूर्वी अमिताभ बच्चन यांचा ‘गुडबाय’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटानंतर लगेच त्यांच्या ‘ऊंचाई’ या चित्रपटाचे पोस्टर्स सोशल मीडियावर शेअर करण्यात आले. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलरसुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटामध्ये त्यांच्यासह बोमन ईराणी, अनुपम खेर, नीना गुप्ता अशा कलाकारांनी काम केले होते. राजश्री फिल्म या निर्मिती संस्थेने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. वर्षाच्या शेवटी अमिताभ आणखी एका चित्रपटासह प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहेत. सध्या ते ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमाच्या चित्रीकरणामध्ये व्यस्त आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या कार्यक्रमामधला एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये अमिताभ यांच्यासमोर सूरज दास असे नाव असलेले स्पर्धक बसले आहेत. केबीसीचा खेळ सुरु असताना सूरज म्हणाले, “तुमच्या ‘मुकद्दर का सिंकदर’ या चित्रपटाच्या सेटवर एका सीनमध्ये तुम्हाला विनोद खन्नांच्या तोंडावर ग्लासमधलं पाणी फेकायचं होतं. पण चुकून तुमच्या हातून तो ग्लास निसटला आणि विनोदजींच्या हनुवटीवर लागून त्याजागी १६ टाके पडले होते. हा किस्सा मी कुठेतरी वाचला होता. हे असं खरच घडलं होतं का?”

आणखी वाचा – ‘झुंड’च्या यशानंतर नागराज मंजुळे घेऊन येत आहेत ‘घर बंदूक बिरयानी’, चित्रपटाबाबत नवी माहिती समोर

त्याचे उत्तर देण्यासाठी बिग बी बोलायला सुरुवात करत “हो अगदीच खरं आहे. माझ्याकडून चूक झाली’ असे म्हणतात. पण उत्साहाच्या भरात सुरज त्यांना मध्येच टोकतात. त्यावर ते हसत ‘मला विचारलं आहे, तर मला बोलू द्या ना..’ असे म्हणतात. त्यानंतर थोडा वेळ शांत राहून सूरज पुन्हा त्यांनी वाचलेले किस्से-कहाण्या सांगू लागतात. त्यांनी केबीसीच्या खेळामध्ये २५ लाख रुपयांची कमाई केली.

आणखी वाचा – “ध्वनी व वायू प्रदूषण टाळा आणि…” दिवाळीच्या शुभेच्छा देताना असं का म्हणाली प्राजक्ता माळी? पोस्ट चर्चेत

सूरज दास यांना ५० लाख रुपयांसाठी पुढील प्रश्न विचारण्यात आला.

२४ नोव्हेंबरला कोणत्या देशामध्ये शिक्षक दिन साजरा केला जातो?
A. पाकिस्तान
B. तुर्की
C. फ्रान्स
D. चीन

याचे अचूक उत्तर सूरज यांना ठाऊक नव्हते. खेळादरम्यान त्यांनी सर्व लाईफलाईन्सचा वापर केला होता. परिणामी त्यांचाकडे अन्य पर्याय उपलब्ध नव्हते. त्यामुळे धोका न पत्कारत २५ लाख रुपयांची धनराशी घेऊन खेळ सोडण्याचा निर्णय घेतला. ५० लाख रुपयांसाठी विचारलेल्या या प्रश्नाचे उत्तर B. तुर्की हे आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amitabh bachchan recalls a scene from the movie muqaddar ka sinkdar with kbc contestant yps
First published on: 22-10-2022 at 16:27 IST