Bigg Boss 16: अर्चना गौतमचा ९ वर्षांपूर्वीच्या ऑडिशनचा व्हिडीओ व्हायरल, अभिनेत्रीने दिलेल्या उत्तरांनी रवी किशनही झालेले आवाक् | archana gautam 9 years old audition video got viral on social media | Loksatta

Bigg Boss 16: अर्चना गौतमचा ९ वर्षांपूर्वीच्या ऑडिशनचा व्हिडीओ व्हायरल, अभिनेत्रीने दिलेल्या उत्तरांनी रवी किशनही झालेले आवाक्

आता या व्हिडीओवर कमेंट्स करत तिने आजपर्यंत केलेल्या प्रगतीचं नेटकरी कौतुक करत आहेत.

archana gautam

‘बिग बॉस १६’ च्या ग्रँड फिनालेला काही दिवस बाकी आहेत. यंदाच्या पर्वाची ‘बिग बॉस’ची ट्रॉफी कोणाच्या हातात जाईल, याचा अंदाज बांधणं प्रेक्षकांसाठी कठीण झालं आहे. पण ‘बिग बॉस १६’ च्या फिनालेतील चार स्पर्धक आतापर्यंत निश्चित झाले आहेत. अर्चना गौतम, प्रियांका चहर चौधरी, शालीन भानोत आणि निमृत कौर अहलुवालिया या ग्रँड फिनालेपर्यंत पोहोचलेल्या स्पर्धक बनल्या आहेत. तर एमसी स्टॅन, शिव ठाकरे आणि सुंबुल यांना या आठवड्याच्या बाहेर जाण्याच्या प्रक्रियेसाठी नॉमिनेट केले आहे. दरम्यान, अर्चना गौतमचा एक जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती एका शोमध्ये ऑडिशन देताना दिसत आहे.

आणखी वाचा : “मला नाही वाटत हा चित्रपट…”; ‘पठाण’चं कलेक्शन पाहून ‘KGF’च्या निर्मात्यांनी केलं मोठं वक्तव्य

हा व्हायरल व्हिडीओ ९ वर्षांपूर्वीचा असल्याचं बोललं जातंय. या शोचं नाव आहे बाजीगर. शोचे जज भोजपुरी अभिनेते आणि राजकारणी रवी किशन, पंकज भदौरिया आणि इतर स्टार्स आहेत. अर्चना गौतम शोमध्ये ऑडिशनसाठी पोहोचताच तिने तिच्या गोड बोलण्याने जजना प्रभावित केल्याचं या व्हिडीओत दिसत आहे. अत्यंत सध्या वेशभूषेत अर्चना या शोच्या ऑडिशनला गेली आहे.

हेही वाचा : Bigg Boss 16: प्रियांका चहर चौधरीच्या फीमध्ये दुपटीने वाढ, आता आठवड्याला आकारते ‘इतके’ मानधन

आता तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. तिच्या अनेक चाहत्यांनी हा तिचा व्हिडीओ शेअर केला आहे. आता या व्हिडीओवर कमेंट्स करत तिने आज मिळवलेल्या यशाचं कौतुक करत आहेत. अनेकांनी कमेंट्स करत “आज आम्हाला तुझा संघर्ष समजला,” असं म्हंटल आहे. तिच्या या व्हिडीओने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-02-2023 at 13:41 IST
Next Story
मंडप सजला, नवरी नटली अन्…; वनिता खरातचा नववधू लूक समोर, मराठी कलाकारांची लग्नासाठी हजेरी