Archana Puran Singh : अर्चना पूरण सिंह बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहेत. त्यांनी चित्रपटांत विविध भूमिका साकारत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. यासह त्या कपिल शर्माच्या शोमधून प्रेक्षकांच्या भेटीला यायच्या. तसेच त्या सोशल मीडियावरही तितक्याच सक्रिय असतात.
अर्चना यामार्फत त्यांच्या आयुष्यातील घडामोडींबद्दल सांगत असतात.
अर्चना यांचा स्वत:चं एक यूट्यूब चॅनेल आहे. यामार्फत त्या त्यांच्या कुटुंबाबरोबर पाहायला मिळतात. अशातच आता त्यांनी एक नवीन ब्लॉग शेअर केला आहे. यामध्ये त्या, त्यांचे पती व मुलांबरोबर दिवाळीची साफसफाई करताना दिसत आहेत. या ब्लॉगमध्ये अर्चना व त्यांची मुलं विनोद करताना दिसतात. त्यावेळी अर्चना यांचा मुलगा आयुष्मान सेठीने त्यांना झाडू देत ते पुष्पगुच्छ आहे असं समज असं म्हटलं, ज्यावर त्या, “तू तुझ्या आईला हे सगळं देणार का” असं म्हणाल्या.
अर्चना यांच्या मुलाची प्रतिक्रिया
ब्लॉगमध्ये अर्चना पुढे सोफ्यावर बसतात आणि त्यांची मुलं घर स्वच्छ करताना दिसतात. त्यावेळी त्या आज तिन्ही जण काम करत आहेत आणि मी बसले आहे असं म्हणतात. यावर त्यांचा मुलगा आयुष्मान गमतीत त्यांना, “तू काम करायला जातेस तिथेही बसलेलीच असतेस” असं म्हणतो.
ब्लॉगमध्ये पुढे सेठी कुटुंब घराची साफसफाई करत असताना बेसनचे लाडू बनवण्याचं ठरवतात. अर्चना यांची बहीण यावेळी त्यांना मदत करतात आणि त्यांची मुलं आर्यमान व आयुष्मान यांना लाडू वळायला शिकवतात. यावेळी त्या अर्चना यांच्याबरोबरची जुनी आठवण सांगत म्हणाल्या, “मी तिला आमच्यामध्ये भांडण व्हायचं तेव्हा खूप मारायचे.”
अर्चना व त्यांच्या कुटुंबाने अनाथ आश्रमातील मुलांसाठी बेसनचे लाडू बनवल्याचं पाहायला मिळतं. त्यांनी अनाथ आश्रमातील मुलांबरोबर दिवाळीला काही दिवस उरलेले असताना सेलिब्रेशन केलं आहे.
दरम्यान, अर्चना यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर त्या नुकत्याच ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’च्या तिसऱ्या पर्वातूनही झळकलेल्या. या शोने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. या व्यतिरिक्त अर्चना खूशी कपूर व इब्राहिम अली खानच्या ‘नादानिया’ चित्रपटातून झळकल्या आहेत.