Balika Vadhu Fame Avika Gor & Milind Chandwani Talks About Family Planning : अविका गौर हिंदी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय चेहरा आहे. ‘बालिका वधू’ या मालिकेतील तिच्या आनंदी या भूमिकेसाठी आजही तिला ओळखलं जातं. अभिनेत्रीनं अलीकडेच बॉयफ्रेंड मिलिंद चंदवाणीसह नॅशनल टेलिव्हिजनवर लग्न केलं. अशातच आता अभिनेत्रीनं व तिच्या नवऱ्यानं कुटुंब नियोजनाबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.
अविका गौर व मिलिंद यांनी ‘पती, पत्नी और पंगा’मध्ये सहभाग घेतलेला पाहायला मिळालं. या जोडीच्या लग्नाला १३ दिवस झाले असून, त्यांनी भविष्यात आई-वडील होण्याबद्दल सांगितलं आहे. यावेळी त्यांनी मूल दत्तक घेण्याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.
मूल दत्तक घेण्याबद्दल अविका गौरच्या नवऱ्याची प्रतिक्रिया
मिलिंद चंदवाणी व अविका गौर यांच्यामध्ये सहा वर्षांचं अंतर आहे. दोघांनी ‘टेली मसाला’सह संवाद साधताना याबद्दल सांगितलं आहे. मुलांबद्दल अविकाचा नवरा मिलिंद म्हणाला, “अजून वेळ आहे. आता आम्ही दोघे एकमेकांसह वेळ घालवणार आहोत. कधी जर वाटलंच तर ठीक आहे; नाही तर मूल दत्तक घेऊ यार… मुलांची कमी थोडी आहे. ज्यांना चांगल्या आई-वडिलांची गरज असेल आणि इतके चांगले आई-वडील कुठे भेटणार.” मिलिंदच्या या प्रतिक्रियेमुळे त्याचं सोशल मीडियावर कौतुक होताना दिसत आहे.
अविका गौर व मिलिंद यांनी नॅशनल टेलिव्हिजनवर ३० सप्टेंबर रोजी लग्न केलं असून, यावेळी या जोडीचं अगदी पारंपरिक पद्धतीनं आणि थाटामाटात लग्न झालं. दोघांच्या लग्नांनाला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावलेली पाहायला मिळाली. अविकानं लग्नाच्या वेळी लाल रंगाचा लेहेंगा व त्यावर डिझायनर ब्लाऊज आणि त्यावर साजेसे दागिने परिधान केले होते. तर, मिलिंदनेही बेबी पिंक रंगाची शेरवाणी आणि त्यावर त्याच गुलाबी रंगाचा फेटा, असा शाही लूक केला होता. दोघांच्या लग्नाचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
दरम्यान, अविका गौरच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, तिनं ‘बालिका वधू’ या मालिकेत बालकलाकार म्हणून काम केलेलं. त्यातील तिच्या भूमिकेमुळे ती घराघरात पोहोचली. त्यानंतर तिनं ‘कलर्स टीव्ही’वरीलच ‘ससुराल सिमर का’ मालिकेत काम केलेलं. यासह ती तेलुगू व हिंदी चित्रपटांत झळकली.